Sanjay Raut : 'आमच्यात माणुसकी म्हणून एकाच फोटोवर..' संजय राऊतांनी बावनकुळेंना पुन्हा डिवचलं
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Sanjay Raut : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आरोपांवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.
मुंबई, 22 नोव्हेंबर (तुषार रुपणवार, प्रतिनिधी) : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ इथं एका कसिनोमध्ये कथितरित्या जुगार खेळतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर दोन्ही गटाकडून आरोपप्रत्यारोपाला सुरुवात झाली. कोणत्याही फोटोच्या आधारे कोणाची इमेज बदनाम करता येत नाही, अशी प्रतिक्रिया देत बावनकुळेंनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला होता. यानंतर संजय राऊत यांनीही बावनकुळेंच्या आरोपला उत्तर दिलं आहे. याचवेळी आमच्यात माणुसकी म्हणून आम्ही एकाच फोटोवर थांबलो, असा इशाराही राऊतांनी दिला आहे.
बावनकुळेंच्या आरोपाल संजय राऊतांचे उत्तर
चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या कथित फोटोवरुन संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं. फोटोवरून कुणाची इमेज खराब करू नये हे त्यांचं म्हण बरोबर आहे. मात्र, त्यांनी हे त्यांच्या सहकाऱ्यांना सांगावे. सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी देखील 40 ते 45 वर्ष राजकारणात घालवली आहे, आम्ही देखील घासली आहे. ते ज्या पद्धतीने हल्ले करतात ते कुठल्या संस्कृतीत बसतं? असा प्रश्न विचारत आता तुम्हाला कळाले असेल की काय होतं आणि काय घडतं. तरी आमच्यात माणुसकी म्हणून आम्ही एकाच फोटोवर थांबलो, असा इशाराच यावेळी संजय राऊत यांनी दिला.
advertisement
चंद्रशेखर बावनकुळेंनी आरोप फेटाळले
मी मागच्या 34 वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक जीवनात आहे. मी विधिमंडळात 20 वर्षांपासून आहे. मी चारवेळा निवडून आलो. अशा फोटोच्या आधारावर कुणाची इमेज खराब करता येत नाही. कुणी हा प्रयत्न केला आहे, त्याला लखलाभ. संघर्ष करून आम्ही आमची इमेज तयार केली आहे. मागील दीड वर्षांपासून मी घरच्यांना वेळ दिला नव्हता. दिवाळीत माझ्या परिवाराने 3 दिवसांसाठी माझा वेळ घेतला आणि आम्ही फिरायला गेलो. मात्र, काहींनी व्यक्तीगत टीका करण्याचा प्रयत्न केला.
advertisement
आम्हाला याचे वाईट वाटलं. कुठल्याही हॉटेलला गेलो तर कसिनोमधूनच क्रॉस करून जावं लागतं. मकाऊ आणि हाँगकाँगला असे कुठलेच हॉटेल नाही. एक लाख देखील तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. हे काय म्हणतात 3 कोटी रुपये. माझे विदेशात कुठलेही मित्र नाही आणि बँक अकाऊंट नाही. कधी काळी ज्यांनी हे विदेशात पैसे ठेवले असतील, काळा धन गोळा करणे यांच्याकडून मला आता समजून घ्यावे लागेल. तीन कोटी कसे घेऊन जातात, असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊत यांच्यावर केला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 22, 2023 5:45 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Sanjay Raut : 'आमच्यात माणुसकी म्हणून एकाच फोटोवर..' संजय राऊतांनी बावनकुळेंना पुन्हा डिवचलं


