Chandrashekhar Bawankule : "फोटोच्या आधारे कोणाची इमेज..."; कसिनोतल्या आरोपांवर बावनकुळेंचं राऊतांना उत्तर, म्हणाले..

Last Updated:

Chandrashekhar Bawankule : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कथितरित्या कसिनोमध्ये जुगार खेळल्याच्या संजय राऊत यांच्या आरोपावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कसिनोतल्या आरोपांवर बावनकुळेंचं राऊतांना उत्तर, म्हणाले..
कसिनोतल्या आरोपांवर बावनकुळेंचं राऊतांना उत्तर, म्हणाले..
मुंबई, 22 नोव्हेंबर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ इथं एका कसिनोमध्ये कथितरित्या जुगार खेळतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना बावनकुळे यांनी पहिल्यांदाच उत्तर दिलं आहे. कोणत्याही फोटोच्या आधारे कोणाची इमेज बदनाम करता येत नाही. मी परिवारासोबत फिरण्यासाठी 3 दिवस गेलो होतो. मी कुटुंबासाठी फक्त 3 दिवस दिले. मात्र, मला आणि परिवाला फार दु:ख झालं, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली.
चंद्रशेखर बावनकुळेंनी आरोप फेटाळले
मी मागच्या 34 वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक जीवनात आहे. मी विधिमंडळात 20 वर्षांपासून आहे. मी चारवेळा निवडून आलो. अशा फोटोच्या आधारावर कुणाची इमेज खराब करता येत नाही. कुणी हा प्रयत्न केला आहे, त्याला लखलाभ. संघर्ष करून आम्ही आमची इमेज तयार केली आहे. मागील दीड वर्षांपासून मी घरच्यांना वेळ दिला नव्हता. दिवाळीत माझ्या परिवाराने 3 दिवसांसाठी माझा वेळ घेतला आणि आम्ही फिरायला गेलो. मात्र, काहींनी व्यक्तीगत टीका करण्याचा प्रयत्न केला.
advertisement
आम्हाला याचे वाईट वाटलं. कुठल्याही हॉटेलला गेलो तर कसिनोमधूनच क्रॉस करून जावं लागतं. मकाऊ आणि हाँगकाँगला असे कुठलेच हॉटेल नाही. एक लाख देखील तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. हे काय म्हणतात 3 कोटी रुपये. माझे विदेशात कुठलेही मित्र नाही आणि बँक अकाऊंट नाही. कधी काळी ज्यांनी हे विदेशात पैसे ठेवले असतील, काळा धन गोळा करणे यांच्याकडून मला आता समजून घ्यावे लागेल. तीन कोटी कसे घेऊन जातात, असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊत यांच्यावर केला आहे.
advertisement
मराठा समाजाला आरक्षणा मिळणार : बावनकुळे
एकनाथ शिंदे यांनी ठरवले आहे, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायचे आहे. ओबीसी मराठा संघर्ष सुरू आहे, तो कुणाला परवडणारा नाही. राज्याचे सामाजिक वातावरण पुढे नेण्याची आमची जबाबदारी आहे. राज्यात सर्वच लोक गुण्या गोविंदाने रहावे, असं आम्हाला वाटतं.
राहुल गांधी बद्दल काय बोलावे याचे उत्तर जनतेने सोशल मीडियावर दिलं आहे. राहुल गांधी यांना मानसिक रोग झाला आहे. मोदींचे तळपणारे नेतृत्व या देशाने पाहिले आहे. निराश अवस्थेत राहुल गांधी बोलले, अशी टीका बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे.
advertisement
महायुतीत ज्या पद्धतीने सर्व स्ट्राँग आहे ते पाहिले तर हजार हत्तीचे बळ या सरकारमध्ये आहे. एकनाथ शिंदे यांच्या सारखा मर्द मराठा मुख्यमंत्री आहे, त्यामुळे इथे सर्वच शेर आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सभेला येत्या काळात माणसे दिसणार नाहीत, असेही बावनकुळे म्हणाले.
advertisement
पुढच्या काळात देवेंद्र फडणवीस यांची यात्रा राज्यात होईल. त्याचे आम्ही नियोजन करतोय. आजचे शिबिर हे त्याचसाठी होते. मोदी सरकारच्या योजना आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या दीड वर्षांपासून जी तयारी सुरू आहे त्याचा आढावा आज आम्ही घेतोय. 45 खासदार आमचे असतील यासाठी हे प्रशिक्षण आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Chandrashekhar Bawankule : "फोटोच्या आधारे कोणाची इमेज..."; कसिनोतल्या आरोपांवर बावनकुळेंचं राऊतांना उत्तर, म्हणाले..
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement