advertisement

'त्यादिवशी अजितदादा 2 तास नॉनस्टॉप...', गायक राहुल वैद्यने शेअर केला अजित पवारांचा तो शेवटचा VIDEO

Last Updated:

Rahul Vaidya Ajit Pawar : राजकारण्यांसोबतच सिनेक्षेत्रातील कित्येक सेलिब्रिटींनीही अजित पवारांसोबतच्या आपल्या आठवणी जागवल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे गायक राहुल वैद्य. ज्याने त्याचा अजित पवारांसोबतचा शेवटचा व्हिडीओ शेअर केला आहे.

News18
News18
अजित पवार राजकारणात होते तरी मनोरंजन क्षेत्राशी त्यांचं एक खास नातं होतं. त्यामुळेच त्यांच्या जाण्यानंतर राजकारणच नव्हे मनोरंजन क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त केली जाते. अभिनेता रितेश देशमुख त्यांच्या अंत्यसंस्काराला गेला होता तर इतर सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. काहींनी अजित पवारांसोबतच्या आपल्या आठवणीही शेअर केल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे गायक राहुल वैद्य. ज्याने त्याचा अजित पवारांसोबतचा शेवटचा व्हिडीओ शेअर केला आहे.
गायक राहुल वैद्य याचा गाण्याच्या शोचा हा व्हिडीओ. ज्यात तो गाणी गाताना दिसतो आहे. बॉलिवूडच्या जुन्या फिल्ममधील ही गाणी आहेत आणि समोर अजित पवार बसलेले दिसत आहेत. जे अगदी मन लावून राहुल वैद्य गात असलेली गाणी ऐकत आहेत.
advertisement
राहुल वैद्यने पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा 6 डिसेंबर 2025 चा व्हिडीओ आहे. अजितदादांनी मला त्यांची आवडती गाणी गायला लावली. जवळपास सलग 2 तास मी त्यांच्या आवडीची गाणी गात होतो. पण ही त्यांची शेवटची भेट असेल असा विचारही मी केला नव्हता. अजित दादा पवार तुम्ही लवकर गेलात. कायम लक्षात राहाल. तुमच्या आत्म्यास शांती लाभो दादा, ओम शांती. अशी पोस्ट त्याने केली.
advertisement
advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू झाल्यावर त्यांच्या कुटुंबासह अनेकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अजित पवारांच्या निधनाच्या बातमीवर अजूनही कित्येकांचा विश्वास बसत नाही आहे.
अजित पवारांचं कुटुंब फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेलं होतं. त्यांचे वडील अनंतराव पवार हे दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्यासोबत बराच काळ काम करत होते. अजित पवार यांनीही ते सगळं जवळून पाहिलं होतं.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'त्यादिवशी अजितदादा 2 तास नॉनस्टॉप...', गायक राहुल वैद्यने शेअर केला अजित पवारांचा तो शेवटचा VIDEO
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement