मनोज जरांगे म्हणाले, आम्ही सरकारवर विश्वास टाकला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास टाकलेला आहे. आमच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. अन्यथा आणखी मोठा जनसमुदाय उसळेल, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय. मनोज जरांगे यांनी आज पासून मराठवाड्याच्या दौरा सुरू केला.
वाचा - लक्ष्मण हाकेंनी सरकार आणि जरांगेंना धरलं धारेवर, केले खळबळजनक दावे
advertisement
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
तुमचं लेकरू म्हणून मनापासून आभार मानतो. हिंगोलीच्या मराठ्यांनी मराठ्यांची शान राखली. स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी उन्हात समाज आला आहे. एका छगन भुजबळचे ऐकून अन्याय कराल तर याद राखा. नाहीतर 288 पैकी एकही उमेदवार निवडून येणार नाही, असा इशारा जरांगे पाटील म्हणाले. सरकारने शहाणपण दाखवण्याची वेळ आहे. आपली एकच मागणी आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या. सगे सोयरे या शब्दाची अंमलबजावणी आमच्या व्याख्यानुसार करा. 180 जातीच्या पोटजाती म्हणून अनेक जाती आरक्षणात घातल्या. आम्ही कुणबी म्हणून 83 नुसार मराठा आरक्षण का नको? 57 लाख नोंदी सापडल्याचं सरकारने लेखी दिलं आहे. कैकाडी समाजाची तर व्यथा फार वेगळी आहे. विदर्भात कैकाडी समाज एससीमध्ये आहे. खानदेशामध्ये एसटीमध्ये आणि तोच समाज मराठवाड्यात आला की ओबीसी होतो, असं मंडल आयोगाने करुन ठेवलं आहे.