बबनराव तायवाडे यांनी म्हटलं की, तक्रार जरी दाखल झाली असली तरी मी त्याला घाबरत नाही. जरांगे यांनी ओबीसी समजाची लायकी काढली. तेव्हा मला समाजातील अनेक लोकांचे फोन आले. आपली लायकी काढली त्यामुळे त्याला उत्तर देताना माझ्या तोंडून ते शब्द निघाले होते. मात्र मी माझे शब्द परत घेतले होते असंही तायवाडे यांनी स्पष्ट केलं.
advertisement
'...अन् म्हणून आम्ही भाजपसोबत युती केली'; शिवसेनेचा दाखला देत भुजबळांनी स्पष्टच सांगितलं
माझ्या वर गुन्हा दाखल झाला असला तरी मी घाबरत नाही. मला कारावास झाला तरी चालेल. आमच्या विरोधात बोलले जात असेल तर एससी समाजाच्या लोकांनी त्यांच्या विरोधात अट्रोसिटी चां गुन्हा दाखल केला तर चालेल का? असा संघर्ष होऊ नये अस आवाहन मी करतो. मी ओबीसी समाजाचां लढा देत आहे त्यासाठी मला कुठलीही किंमत मोजावी लागली तरी मी तयार असल्याचं तायवाडे यांनी म्हटलं.
काय म्हणाले होते बबनराव तायवाडे?
जरांगे पाटलांचा मी निषेध करतो, धिक्कार करतो. आतापर्यंत आम्ही गप्प होतो. पण ज्या दिवशी आमचा अपमान होईल तेव्हा तो सहन करणार नाही. यानंतर ओबीसींविरोधात कोणी बोलण्याची हिंमत केली तर त्याचे हातपाय कापून टाकू. आम्ही ६० टक्के लोकं आहोत आणि आमचा अपमान आम्ही सहन करणार नाही याची जरांगेंनी दखल घ्यायला हवी असं तायवाडे म्हणाले होते.
