advertisement

'...अन् म्हणून आम्ही भाजपसोबत युती केली'; शिवसेनेचा दाखला देत भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

Last Updated:

छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. ते कर्जतमध्ये अजित पवार गटाच्या शिबीरात बोलत होते.

छगन भुजबळ
छगन भुजबळ
कर्जत, 1 डिसेंबर : अजित पवार यांच्या बंडामुळं राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केल्यानंतर भाजपला पाठिंबा देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तर महाविकास आघाडीसोबतच राहण्याची भूमिका शरद पवार यांनी घेतली. सध्या राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा न्यायालयीन लढा चालू आहे. सोबतच दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव न घेतला जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले भुजबळ? 
'अनेक वेळा भाजपसोबत जाण्याची तयारी झाली. मग पुन्हा अचानक निर्णय बदलला.  शिवसेनेची आणि भाजपची विचारधारा सारखीच मग भाजपासोबत जाण्यास विरोध का? आम्ही  जनहितासाठी भाजपसोबत गेलो, सत्तेसाठी गेल्याचा प्रचार चुकीचा. अजितदादा स्वार्थासाठी नाही तर विकासासाठी सत्तेत गेले. जनतेनं आमच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे. ग्रामपंचायतींच्या निकालावरून ते स्पष्ट दिसत असल्याचं' भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते कर्जत येथे आयोजित अजित पवार गटाच्या शिबीरामध्ये बोलत होते.
advertisement
पुढे बोलताना ते म्हणाले की, 'सध्या पक्ष कोणाचा आहे याची न्यायलयीन लढाई सुरू आहे. पक्ष आमचाच आहे. निकाल आमच्या बाजूने लागले. आम्हाला न्याय मिळेल' असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. आपल्याला जास्तीत जास्त आमदार, खासदार निवडून आनावे लागतील असं आवाहनही यावेळी भुजबळ यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांना केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
'...अन् म्हणून आम्ही भाजपसोबत युती केली'; शिवसेनेचा दाखला देत भुजबळांनी स्पष्टच सांगितलं
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement