हिंगोलीत एका वृद्ध व्यक्तीने चक्क स्वतःच्या मृत्यूची वेळ सांगितली. हिंगोली तालुक्यातील लिंबी गावात हा अंधश्रद्धेची घटना पहायला मिळाली. धोंडबाराव देवकते असं या वृद्ध व्यक्तीचं नाव आहे.
या देशात पेट्रोलपेक्षा महाग पाणी, किंमत थक्क करणारी!
मला आज दुपारी दोन वाजून 57 मिनिटांनी मरण येणार आहे, असं या व्यक्तीने घरच्या सर्वांना सांगितलं होतं. त्यामुळे नातेवाईकांची व गावकऱ्यांची गर्दी जमली. घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले. घरात धार्मिक वातावरण असलेल्या हा व्यक्ती असून शिक्षितही आहे. धोंडबाराव देवकते यांचं वय साधारण पंच्याहत्तर वर्षे आहे.
advertisement
दरम्यान, व्यक्तीच्या या वाक्यानं संपूर्ण गावासह पोलीसही जमले मात्र तो वृद्ध व्यक्ती अजून जिवंत आहे. त्याला काहीही झालं नाही. या घटनेनं सध्या चांगलीच खळबळ उडाली असून सर्वत्र चर्चा रंगली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 03, 2024 6:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
दुपारी 2 वाजून 57 मिनिटांनी मी मरणार; वृद्धाची भविष्यवाणी खरी ठरली का? पाहण्यासाठी हिंगोलीत गाव लोटलं
