मिळालेल्या माहितीनुसार, महाविद्यालयात शैक्षणिक शिक्षण घेत असताना मृत परमेश्वरकडे फी साठी तगादा लावला होता. मात्र, घरची हलाकीची परिस्थिती असल्याने तो पैसे भरू शकत नव्हता. याच नैराश्यातून 17 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना आज शनिवार 21 ऑक्टोबरला दौंडगाव येथे घडली. संबंधित विद्यार्थ्यास उपचारासाठी जिंतूर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. परमेश्वर संभाजीनगर येथे अकरावीमध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता.
advertisement
हा विद्यार्थी या मागील वर्षभरापासून संभाजीनगर येथे एका खाजगी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता. यासाठी वडिलांकडे त्याने महाविद्यालयाची शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी पैशाची मागणी केली. परंतु, आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने सोयाबीनची काढणी झाल्यानंतर फी भरू, असे वडिलांनी आश्वासन दिले. दुसरीकडे महाविद्यालयाचा फी साठी तगादा सुरुच होता. यामुळे विद्यार्थी नैराश्यात गेल्याने त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
