advertisement

कुत्रा भुंकल्याने शेजाऱ्याने गाठला क्रूरतेचा कळस, मालकिणीला मारहाण; पीडित म्हणाली, प्रायव्हेट पार्टमध्ये...

Last Updated:

एका व्यक्तीचा एका महिलेशी जोरदार वाद झाल्यामुळे या व्यक्तीने महिलेकडील पाळीव कुत्र्यासोबत अमानवीय कृत्य केलं आहे. या प्रकरणी संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार केली असून, तपास सुरू आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : अलीकडच्या काळात पाळीव किंवा भटक्या कुत्र्यांमुळे गंभीर घटना घडत आहेत. कुत्र्यांच्या हल्ल्यात व्यक्ती जखमी होणं, पाळीव कुत्र्यांवरुन वाद निर्माण होणं आदी घटनांचा यात समावेश असल्याचं दिसतं. ओडिशामध्ये अशाच प्रकारची पण अमानवीय घटना घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीचा एका महिलेशी जोरदार वाद झाल्यामुळे या व्यक्तीने महिलेकडील पाळीव कुत्र्यासोबत अमानवीय कृत्य केलं आहे. या प्रकरणी संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार केली असून, तपास सुरू आहे.
ओडिशातल्या एका व्यक्तीने आपल्या शेजारी राहणाऱ्या महिलेचा विनयभंग केला कारण तिचा पाळीव कुत्रा सतत भुंकत होता. महिलेने या पुरुषावर आणि त्याच्या वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत. आरोपीने माझ्या केसांना पकडून मला फरपटत रस्त्यावर नेले आणि नंतर माझे कपडे फाडले. तसंच माझ्या पाळीव कुत्र्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घुसवला, असे आरोप या महिलेनं केले आहेत.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील भुवनेश्वरमधील कॅपिटल पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ही घटना घडली आहे. आरोपीचे नाव चंदन नायक असून, त्याने पाळीव कुत्र्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. संबंधित महिलेने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत महिलेने चंदन नायकवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक करावी, अशी मागणीदेखील या महिलेने केली आहे.
advertisement
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाविषयी कॅपिटल पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर पद्मनाभ प्रधान यांनी सांगितलं की, ``महिलेने गंभीर आरोप केले आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपींवर लवकरच कारवाई करण्यात येईल.``
महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ``दुपारच्या वेळी चंदन आणि त्याचे वडील माझ्या घरासमोर येऊन आरडाओरडा करू लागले. मी दरवाजा उघडल्यानंतर दोघांनी मला शिवीगाळ करायला सुरूवात केली. गैरवर्तन केल्यानंतर मी पाळीव कुत्र्याला शांत करण्यास नकार दिला तेव्हा चंदनने माझे केस ओढत मला फरपटत रस्त्यावर नेले आणि माझे कपडे फाडले. यानंतर आरोपीने तिचा विनयभंग केला आणि बलात्काराचा प्रयत्न केला. तसेच माझ्या पाळीव कुत्र्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला आणि कुत्र्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घुसवला. या सर्व कृत्यात आरोपीच्या वडिलांनी त्याला साथ दिली, `` असे या महिलेने सांगितले. या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
कुत्रा भुंकल्याने शेजाऱ्याने गाठला क्रूरतेचा कळस, मालकिणीला मारहाण; पीडित म्हणाली, प्रायव्हेट पार्टमध्ये...
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement