advertisement

Nagpur News : धक्कादायक! मोबाईल दिला नाही म्हणून मुलानंच केली आईची हत्या, नागपूर हादरलं

Last Updated:

नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलानंच आपल्या आईची हत्या केली आहे.

News18
News18
नागपूर, 21 ऑक्टोबर, उदय तिमांडे : आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नागपूरमधून समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. निर्दयी मुलानं स्वत:च्या आईचा गळा दाबून तिची हत्या केली. गळ्यावरील जखमांमुळे आरोपीचे बिंग फुटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रामनाथ बडबाईक  असं आरोपीचं नाव आहे, तर कमलाबाई बडबाईक असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी मुलानं आपल्या आईचा गळा दाबून तिची हत्या केली आहे. नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली आहे. शवविच्छेदन अहवालात कमलाबाई बडबाईक यांच्या गळ्यावर जखमा आढळून आल्यानं त्यांची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनाकडून देण्यात आली आहे.
advertisement
शुल्लक कारणातून हत्या 
आरोपीला दारूचे व्यसन होते. तो दारू पिण्यासाठी सतत पैशांची मागणी करायचा. त्याने दारूचे व्यसन भागविण्यासाठी आईकडे मोबाईलची मागणी केली होती. मात्र आईने मोबाईल देण्यास नकार दिला. आईने मोबाईल देण्यास नकार दिल्यानं आरोपीने आईची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Nagpur News : धक्कादायक! मोबाईल दिला नाही म्हणून मुलानंच केली आईची हत्या, नागपूर हादरलं
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement