सॅलरी मिळाल्यानंतर पार्टी करत होते 2 भाऊ; 'लाइट पेग' बनवण्यावरुन वाद अन् हत्येचा थरार
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
रागाच्या भरात सुभाषने काठी उचलून सुशीलच्या डोक्यात अनेक वार केले. यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. यानंतर सुभाषने त्याला जखमी अवस्थेत रस्त्यावर फेकून दिलं
लखनऊ 21 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. पगार मिळाल्यानंतर दारू पिऊन पार्टी करणाऱ्या मामेभावाने तरुणाची हत्या करून मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून पळ काढला. दारूचा पेग लहान बनवल्याच्या रागात त्याने ही हत्या केली असल्याचं सांगितलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या चिनहट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाराबंकी येथे राहणारा सुशील यादव आणि त्याचा मामेभाऊ सुभाष यादव हे समर्पण हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये काम करतात. पगार मिळाल्यानंतर दोघेही त्यांचा मित्र सुशील चौरसियासोबत दारू पार्टी करत होते. यावेळी सुशील आणि सुभाष यांच्यात पेग बनवण्यावरून वाद सुरू झाला.
advertisement
रागाच्या भरात सुभाषने काठी उचलून सुशीलच्या डोक्यात अनेक वार केले. यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. यानंतर सुभाषने त्याला जखमी अवस्थेत रस्त्यावर फेकून दिलं आणि तिथून पळ काढला. यानंतर त्याच्या एका मित्राने जखमीला रुग्णालयात दाखल केलं, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यानंतर कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला.
advertisement
पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. एडीसीपी अली अब्बास यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील यादव, सुशील चौरसिया आणि सुभाष यादव यांच्यासह तीन जण दारू पार्टी करत होते. यावेळी दारुवरून वाद झाला आणि याचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं. मामेभावाने अनेक वार करून तरुणाची हत्या केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 21, 2023 7:50 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
सॅलरी मिळाल्यानंतर पार्टी करत होते 2 भाऊ; 'लाइट पेग' बनवण्यावरुन वाद अन् हत्येचा थरार








