TRENDING:

Election: मतदानासाठी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर, पण 29 ठिकाणीच नियम लागू, संपूर्ण यादी

Last Updated:

महाराष्ट्रात २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. पुढील आठवड्यात  गुरुवार

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: राज्यात २९ महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा जोर आता चांगलाच वाढला आहे. रॅली, प्रचार सभांमुळे सर्वत्र नेत्यांची एकच भाऊगर्दी झाली आहे. एकीकडे प्रचाराला रंग चढला आहे तर दुसरीकडे मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने आता मोठी घोषणा केली आहे. राज्यात २९ महापालिका निवडणुकीसाठी संबंधित मतदान क्षेत्रामध्ये १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
News18
News18
advertisement

महाराष्ट्रात २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. पुढील आठवड्यात  गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदानक्षेत्रात १५ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना राज्य सरकारकडून  प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ही अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं, महामंडळं, मंडळं इत्यादींच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही सार्वजनिक सुट्टी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदारसंघाबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे.

advertisement

या महापालिका क्षेत्रामध्ये सुट्टी जाहीर

अ.क्र. विभाग जिल्हा महानगरपालिकेचे नाव
कोकण विभाग मुंबई शहर/मुंबई उपनगर बृहन्मुंबई महानगरपालिका
ठाणे ठाणे
नवी मुंबई
उल्हासनगर
कल्याण-डोंबिवली
भिवंडी-निजामपूर
मिरा-भाईंदर
पालघर वसई-विरार
रायगड पनवेल
१० नाशिक विभाग नाशिक नाशिक
११ मालेगाव
१२ अहिल्यानगर अहिल्यानगर
१३ जळगाव जळगाव
१४ धुळे धुळे
१५ पुणे विभाग पुणे पुणे
१६ पिंपरी-चिंचवड
१७ सोलापूर सोलापूर
१८ कोल्हापूर कोल्हापूर
१९ इचलकरंजी
२० सांगली सांगली-मिरज-कुपवाड
२१ छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर
२२ नांदेड नांदेड-वाघाळा
२३ परभणी परभणी
२४ जालना जालना
२५ लातूर लातूर
२६ अमरावती विभाग अमरावती अमरावती
२७ अकोला अकोला
२८ नागपूर विभाग नागपूर नागपूर
२९ चंद्रपूर चंद्रपूर

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांच्या पदरी निराशा, सोयाबीन दर घसरले,तूर आणि कांद्याला काय मिळाला भाव?
सर्व पहा

तर रायगड, कोकण, गडचिरोलीसह इतर भागांमध्ये महापालिकेची निवडणूक होत नाहीये, त्या ठिकाणी सुट्टी नसणार आहे. तसंच, या सगळ्या २९ भागांमध्ये शाळा, कॉलेज आणि विद्यापीठांना सुट्टी जाहीर असणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Election: मतदानासाठी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर, पण 29 ठिकाणीच नियम लागू, संपूर्ण यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल