TRENDING:

बंजारा समाजात दिवाळीला गोधनाची केली जाते पूजा आणि पारंपारिक गीतावर धरला जातो ठेका

Last Updated:

बंजारा समाजातही इतरांप्रमाणे दिवाळीचे महत्त्व खूप आहे, पण त्यांच्या साजरीकरणात काही विशेष परंपरा आहेत ज्या इतर समाजांपेक्षा वेगळ्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायण काळे-प्रतिनीधी, जालना :
advertisement

दिवाळी हा सण संपूर्ण भारतात विविध प्रकारे साजरा केला जातो. बंजारा समाजातही दिवाळीचे महत्त्व खूप आहे, पण त्यांच्या साजरीकरणात काही विशेष परंपरा आहेत ज्या इतर समाजांपेक्षा वेगळ्या आहेत. आपली बोलीभाषा, वेशभूषा आणि उत्साही संस्कृतीसाठी ओळखला जाणारा बंजारा समाज दिवाळीला खास उत्साहाने साजरा करतो. दिवाळी आणि होळी हे बंजारा समाजातील मुख्य सण असून, या सणांमध्ये बंजारा समाजातील सर्वच वयोगटांतील सदस्य मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.

advertisement

दिवाळीतील पाडव्याच्या दिवशी बंजारा समाजातील कुमारिका मुली "गोधन पूजा" करतात. या दिवशी मुली सुंदर वस्त्र परिधान करून गाई-गुरांच्या शेणाची पूजा करतात. पारंपारिक लोकगीतांच्या तालावर फेर धरून, या मुली गावातील नदीवर गोधन पूजेसाठी लागणारे साहित्य आणतात. हे साहित्यासह देवीच्या मंदिराजवळ गोधनाची पूजा होते. या पूजेचा उद्देश गाई, गुरे यांचा सन्मान आणि संपूर्ण कुटुंबाचे कल्याण साधणे हा आहे.

advertisement

लक्ष्मीपूजन आणि घरोघरी शुभेच्छा

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी घरोघरी दिवे लावून घर सुशोभित केले जाते. यानंतर मुली आपल्या हातात एक प्रज्वलित दिवा घेऊन गावभर फिरून प्रत्येक घरी जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा देतात. या शुभेच्छांचा स्वीकार करून घरातील वडीलधारी मंडळी त्या मुलींना साखर आणि काही पैसे देतात. या साखरेची बर्फी तयार होते, आणि गोळा केलेले पैसे मुलींमध्ये वाटले जातात. या परंपरेतून बंजारा समाजातील कुटुंबांमध्ये प्रेम आणि ऐक्य बळकट होतं.

advertisement

संस्कृती जतनाची परंपरा

ग्लोबलायझेशनमुळे अनेक परंपरा हरवत चालल्या आहेत, तरी बंजारा समाज आजही त्यांच्या प्रथा आवडीने जपत आहे. बंजारा समाजाचे लोकगीत, वेशभूषा, आणि पारंपरिक परंपरा यामुळे इतर समाजांसाठीही बंजारा समाज आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बंजारा समाजात दिवाळीला गोधनाची केली जाते पूजा आणि पारंपारिक गीतावर धरला जातो ठेका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल