पंचांगानुसार यंदा गणेश चतुर्थी तिथीची सुरुवात 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 54 मिनिटांनी होणार असून, समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून 44 मिनिटांनी होणार आहे. जेव्हा तुम्ही घरात प्राणप्रतिष्ठेसाठी बाजारातून गणेश मूर्ती घेण्यासाठी जाल तेव्हा गणेश मूर्तीच्या सोंडेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. शास्त्रानुसार डाव्या सोंडेच्या गणेश मूर्तीची घरात स्थापना करणे अधिक शुभ मानले जाते.
advertisement
Ganeshotsav 2025: घरात गर्भवती स्त्री असताना गणपती विसर्जन करावं का? शास्त्र काय सांगतं?
गणेशाचीमूर्ती उभी आहे की आडवी, हे देखील महत्वाचे ठरतं. घरात सिंहासनावर बसलेली व हातात मोदक असलेली मूर्ती स्थापन करावी. गणेशमूर्तींची घरात स्थापना करताना ईशान्य दिशेला करावी. मूर्तीचे तोंड उत्तर दिशेला ठेवावं. घरात गेणशमूर्ती आणल्यानंतर मूर्तीची विधिवत पूजा करून त्यानंतरच प्राणप्रतिष्ठा करावी. दररोज सकाळी स्नान करून सकाळ आणि संध्याकाळ मूर्तीची विधिवत आरती करावी.
घरातील वातावरण कसे असावे?
असं म्हटलं जातं की, गणेश चतुर्थीच्या दिवशी पार्वतीपुत्र गणेश पृथ्वीवर येतात आणि पुढील 10 दिवस आपल्या भक्तांना सेवा आणि भक्ती करण्याची संधी देतात. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात गणपती मूर्तीची स्थापना केल्यानंतर 10 दिवस घरातील वातावरण हे शांत आणि पवित्र ठेवावे. घरातील सदस्यांकडून भांडण किंवा चिडचिड होणार नाही याची काळजी घ्यावी.