TRENDING:

IBPS मध्ये 13217 रिक्त जागांसाठी मेगाभरती, पदवीधर करू शकतात अर्ज; अर्जाची शेवटची तारीख आली जवळ

Last Updated:

बँकिंग कार्मिक निवड संस्थेने सप्टेंबर 2025 मध्ये क्षेत्रीय ग्रामीण बँकांमध्ये अधिकारी आणि कार्यालय सहाय्यक पदांसाठी तब्बल 13,217 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रात नोकरी करणाऱ्या नोकरदारांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. बँकेमध्ये नोकरीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकिंग कार्मिक निवड संस्थेने सप्टेंबर 2025 मध्ये क्षेत्रीय ग्रामीण बँकांमध्ये (RRB Bharti 2025) अधिकारी (Scale-I, II, III) आणि कार्यालय सहाय्यक पदांसाठी तब्बल 13,217 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
News18
News18
advertisement

इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता, अर्ज भरण्यासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची गरज आहे, जाणून घेऊया...

देवा नको अंत पाहू..;सोन्यासारखं पिक पाण्यात वाहून गेलं,डोळ्यात पाणी आणणारा VIDEO

आयबीपीएस आरआरबी भरती 2025 च्या माध्यमातून, कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), अधिकारी स्केल -I (सहाय्यक व्यवस्थापक), अधिकारी स्केल -II (कृषी अधिकारी, पणन अधिकारी, ट्रेझरी मॅनेजर, कायदा, सीए, आयटी, सामान्य बँकिंग अधिकारी) आणि अधिकारी स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक) या पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्जदारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. 1 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या अर्ज प्रक्रियेची अखेरची तारीख 28 सप्टेंबर आहे. अर्जदारांनी लवकरात लवकर अर्ज भरून परीक्षेसाठी तयारी करायची आहे.

advertisement

'कटस्थान'चा अपभ्रंश होऊन 'कडेठाण' झाला, 'कडेठाण' देवीचा रंजक इतिहास...

Institute of Banking Personnel Selection RRB Bharti 2025 मध्ये एकूण 13, 217 पदांसाठी भरती केली जात आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन असून खुला प्रवर्गासाठी अर्ज शुल्क रु. 850/- आणि राखीव प्रवर्गासाठी रु. 175/- आहे. अर्ज करण्याची तारीख आणि अर्ज शुल्क भरण्याची तारीख एकाच दिवसापासून सुरुवात झाली असून एकाच दिवशी अखेरची तारीख असणार आहे. अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 सप्टेंबर 2025 असणार आहे. IBPS द्वारे ही भरती प्रक्रिया आयोजित केली जात आहे.

advertisement

योगामध्ये मिळवली 200 हून अधिक सुवर्णपदके, पुण्यातील अलका यांची प्रेरणादायी कहाणी

कार्यालय सहाय्यक पदासाठी 7972 जागा, अधिकारी स्केल- I पदासाठी 3907 जागा, अधिकारी स्केल-II पदासाठी 50 जागा, अधिकारी स्केल-II पदासाठी 48 जागा, अधिकारी स्केल-II पदासाठी 69 जागा, अधिकारी स्केल-II पदासाठी 87 जागा, अधिकारी स्केल-II (General Banking Officer) पदासाठी 854 जागा, अधिकारी स्केल-II (Marketing Officer) पदासाठी 15 जागा, अधिकारी स्केल-II (Treasury Manager) पदासाठी 16 जागा, अधिकारी स्केल III पदासाठी 199 जागांसाठी IBPS कडून नोकर भरती केली जात आहे.

advertisement

श्रद्धा- अर्थव्यवस्थेला गती देणारा ‘कुंभ मेळावा’; रोजगार, उत्पन्नात होणार भरभराट

कार्यालय सहाय्यक (Multipurpose) साठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. अधिकारी स्केल-I (Assistant Manager) साठी कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. कृषी, फलोत्पादन, वनशास्त्र, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, मत्स्यपालन, कृषी विपणन आणि सहकार, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र किंवा लेखाशास्त्र या विषयात पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. अधिकारी स्केल-II General Banking Officer (Manager) साठी कोणत्याही शाखेतील पदवी किमान 50% गुणांसह आवश्यक आहे.

advertisement

बंजारा समाजाची नवरात्रीमध्ये आगळी- वेगळी परंपरा, अनोख्या पद्धतीने केली जाते पूजा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण; कांदा आणि मक्याला किती मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

बँकिंग, वित्त, विपणन, कृषी, फलोत्पादन, वनशास्त्र, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, मत्स्यपालन, कृषी विपणन आणि सहकार, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र आणि लेखाशास्त्र या विषयात पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. अधिकारी स्केल-II Specialist Officers (Manager) साठी इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / कम्प्यूटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधे पदवी किमान 50% गुणांसह आवश्यक आहे. कार्यालय सहाय्यक (Multipurpose) पदासाठी 18 ते 28 वर्षे, अधिकारी स्केल- II (Manager) पदासाठी 21 ते 32 वर्षे, अधिकारी स्केल- I (Assistant Manager) पदासाठी 15 ते 30 वर्षे, अधिकारी स्केल- III (Senior Manager) पदासाठी 21 ते 40 वर्षे अशी वेगवेगळ्या पदांसाठी लागणारी वयोमर्यादा आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
IBPS मध्ये 13217 रिक्त जागांसाठी मेगाभरती, पदवीधर करू शकतात अर्ज; अर्जाची शेवटची तारीख आली जवळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल