समीर जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, माणूस जन्माला आल्यानंतर तीन प्रकारचे ऋण घेऊन येतो. देव ऋण, पितृ ऋण आणि मणुष्य ऋण, असे तीन प्रकार आहेत. यापैकी पितृ ऋण फेडण्यासाठी पितृ पक्ष हा महत्त्वाचा काळ मानला जातो. या पितृ पक्षात आपल्या पितरांची शांति केल्यास आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात. या पंधरवाड्यात आपल्या पितरांची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला मिळत असते.
advertisement
पितरांची सेवा कशी करावी?
पितृ पक्षात पितरांचं पिंड दान, तर्पण किंवा वैश्वदेव या पूजा करून आपण आपल्या पितरांची शांति आणि पूजा करू शकतो. आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्या दिवसाच्या तिथी प्रमाणे आपण पिंड दान करू शकतो. ज्यांना व्यक्तीच्या मृत्यूची तिथी माहिती नसेल ते सर्वपित्री आमावस्येच्या दिवशी ही पूजा करू शकतात.
2025मधील पितृ पक्षातील श्राद्ध तिथी
7 सप्टेंबर 2025 पासून पितृ पक्षाची सुरुवात होते. प्रौष्ठप्रदी पौर्णिमा 8 सप्टेंबर, प्रतिपदा श्राद्ध 9 सप्टेंबर, द्वितीया श्राद्ध 10 सप्टेंबर, तृतीया श्राद्ध / चतुर्थी श्राद्ध 11 सप्टेंबर, पंचमी श्राद्ध / महा भरणी श्राद्ध 12 सप्टेंबर, षष्ठी श्राद्ध 13 सप्टेंबर, सप्तमी श्राद्ध 14 सप्टेंबर, अष्टमी श्राद्ध 15 सप्टेंबर, नवमी श्राद्ध 16 सप्टेंबर, दशमी श्राद्ध 17 सप्टेंबर, एकादशी श्राद्ध 18 सप्टेंबर, द्वादशी श्राद्ध 19 सप्टेंबर, त्रयोदशी श्राद्ध / चतुर्दशी श्राद्ध 20 सप्टेंबर रोजी आहे. 21 सप्टेंबर रोजी सर्वपित्री दर्श आमावस्या आहे.
सर्वपित्री आमावस्येचं महत्व
पितृपक्षाचा काळ पितरांचा आशीर्वाद घेण्यासाठी उत्तम मानला जातो. मात्र, अनेकांना आपल्या पूर्वजांची श्राद्धतिथी माहीत नसते. तरीदेखील त्यांच्या नावे तर्पण करण्याची इच्छा असते. अशा भाविकांसाठी सर्वपित्री ही तिथी राखीव ठेवली आहे. यावर्षी रविवार, 21 सप्टेंबर रोजी सूर्यग्रहण असले तरी त्यादिवशी सर्वपित्री आमावस्येला श्राद्धविधी करता येतील.