साताऱ्यातील वाई तालुक्यातील भुईंज जवळच्या चिखली गावातील पुरातन भैरवनाथ मंदिरात सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन पट खेळांचे संशोधन केले आहे. या खेळाचे दस्तऐवजीकरण आणि नोंदणी झाले असून, साताराच्या इतिहासात मोलाची भर पडल्याचे पाहायला मिळते.
इतिहासात प्राचीन काळी मनोरंजनासाठी विविध खेळ खेळले जात होते. पचीशी, चतुरंग सारख्या कित्येक बैठक खेळांचा उगम भारतामध्येच झाला. त्याचबरोबर या मातीतल्या समृद्धी प्राचीन व्यापारामुळे इथल्या व्यापारमार्गे भारतात आले. आजही त्यांचे कोरीव अवशेष विविध ऐतिहासिक आणि प्राचीन मंदिरामध्ये पाहायला मिळतात. प्राचीन लेना मंदिरात घाटांवर, जमिनीवर दगडांवर अशा पट खेळाचे अवशेष आढळतात. या ऐतिहासिक खुणांमुळे इतिहास उघडण्याचे काम या मोहिमांच्या माध्यमातून होत आहे. महाराष्ट्रातील वेरूळ, नाशिक, पुणे, सोलापूर यासह अनेक ठिकाणी प्राचीन व्यापारी मार्गाच्या खुणा प्रकाशझोतात आले आहेत. आता साताऱ्यातील संशोधनाने या यादीत, जिल्हा आणि राज्याच्या प्राचीन इतिहासात नक्कीच महत्त्वपूर्ण वाढ झाली आहे.
advertisement
सातारा जिल्ह्यात प्रथमच सापडलेले हे प्राचीन पट खेळाचे अवशेष म्हणजे साताऱ्याच्या प्राचीन आणि पवित्र भूमी गुणगौरव देशभर आणि जगभर होत आहे. यामुळे मातीतील प्रत्येकासाठी एक आनंदाची गोष्ट ठरली आहे. हा इतिहास आणि हा ऐतिहासिक ठेवा इथल्या प्रत्येक सर्वसामान्यांचा आहे, जो प्राचीन भारताचा गौरवशाली आंतरराष्ट्रीय व्यापाराशी निगडित आहे. म्हणूनच त्याचा प्रचार-प्रसार बरोबर त्याचा जतन आणि संवर्धन करण्याचे कर्तव्य आपल्या सर्व सातारकरांसह महाराष्ट्रवासीयांचे आहे, असे देखील इतिहास अभ्यासक साक्षी महामुलकर यांनी सांगितले आहे.
पट खेळांचा संदर्भ कोण कोणत्या देशांशी येतो?
साताऱ्यातल्या चिखली या गावात असलेल्या भैरवनाथाच्या मंदिरात सात प्रकारच्या पट खेळाचे अवशेष सापडले आहेत. इतिहास अभ्यासकांच्या मते, या प्राचीन काळातील व्यापारी वर्गाच्या खुणा आहेत. ज्या मंदिरामध्ये हे अवशेष सापडले आहेत, ते मंदिर अति प्राचीन म्हणजे यादवकालीन असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. या मंदिराचा निर्माता सिंघनदेव राजा असल्याचे सांगितले जाते. नवकनकरी, वाघ बकरी, अष्टचल्लस, पंचखेलिया असे पट खेळ सापडले आहेत. पंचखेलिया चा संदर्भ श्रीलंकेशी जोडला जातो, तर बाकी इजिप्त, रोम, या ठिकाणचे खेळ असल्याचे संदर्भ इतिहास अभ्यासकांच्या मते सांगण्यात आले आहेत. याच्या इतिहासाच्या पानांमध्ये लिखित स्वरूपामध्ये याचे पुरावे होते; मात्र या खेळांच्या अवशेष सापडल्यानंतर हे स्पष्ट रूप सिद्ध झाले आहे, असे देखील इतिहास अभ्यासकांनी सांगितले आहे.