जालिंदर सुपेकर यांची बदली उप महासमादेशक होमगार्ड या पदावर करण्यात आली आहे. अत्यंत अकार्यक्षम किंवा वादग्रस्त अधिकाऱ्यांना हे पद दिलं जातं, असे संकेत पोलिस खात्यात आहेत. सुपेकर हे विशेष पोलीस महानिरिक्षक कारागृह व सुधार सेवा या पदावर कार्यरत होते.
शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांचा मामा असलेले तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर यांचं नाव समोर आलंय. हगवणेंना मिळालेल्या शस्त्र परवान्यांवर मामा सुपेकरची सही होती. हगवणे बंधूंना शस्त्रपरवाने मिळवून देण्यासाठी खोटे पत्ते दिल्याच माहिती असूनही परवाने मिळवून दिल्याचा आरोप करण्यात आलाय.
advertisement
वैष्णवी हगवणेच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी जालिंदर सुपेकर यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप अंजली दमानिया आणि रूपाली ठोंबरे पाटील यांनी केला होता. आरोपांमुळे चर्चेत आलेल्या सुपेकरांची आतापर्यंतची कारकीर्द चर्चेत आली आहे.
जालिंदर सुपेकर कोण आहेत?
जालिंदर सुपेकर यांची 1996 मध्ये MPSC मार्फत Dy.SP पदावर नियुक्ती झाली होती.
परभणी, सातारा, जळगावसह इतर जिल्ह्यात त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलंय.
महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक, तसेच CID टेक्निकल सर्व्हिसेस नंतर पुणे येथे त्यांनी अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारी पार पाडली.
तिथे त्यांच्या कार्यकाळात तब्बल चारशे पेक्षा अधिक शस्त्र परवाने देण्यात आले.
कारागृह विभागात तब्बल पाचशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची चौकशी होईल का? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.