TRENDING:

SPECIAL REPORT: राहुल गांधींनी टाकला बॉम्ब, आता महाराष्ट्रात 4 ठिकाणी मतदार याद्यांमध्ये 'गोलमाल' उघड

Last Updated:

महाराष्ट्र आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगानं बनावट मतदारांच्या मदतीनं भाजपला मदत केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमध्ये कसा घोळ झाला याचे पुरावे दिल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. आता महाराष्ट्रातही मतदार यादीतले घोळ मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगानं बनावट मतदारांच्या मदतीनं भाजपला मदत केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्यात 4 मोठे घोळ उघड झाले आहे. त्यामुळे मतदार याद्यांवर संशय व्यक्त केला जातोय.
News18
News18
advertisement

पैठण, चंद्रपूर, नालासोपारा आणि नाशिक राज्यातील ही चार ठिकाणं. पण यांच्यात एक समान धागा आहे, तो म्हणजे घोळ.

'पैठण शहरात 2698 मतदारांची दोनदा नोंदणी

सुरूवातीला पाहुया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणपासून.  पैठण शहरात जवळपास सव्वीसशे मतदारांची नावं डबल आहेत. पैठणमधून इतर ठिकाणी स्थलांतरित झालेल्या मतदारांची ही नाव आहेत. इतरत्र स्थायिक झालेल्या मतदारांनी आधी असलेल्या मतदार यादीतील नावे वगळली नाहीत. त्यामुळे दुहेरी नावं असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

advertisement

तर राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपनं मतचोरी आणि बनावट मतदानातून विजय मिळवल्याचा आरोप केला होता. तसंच महाराष्ट्रात 5 महिन्यात 40 लाख मतदार वाढल्याचा दावाही राहुल गांधींनी केला होता. आणि त्यानंतर राज्यात मतदार यादीतील घोळांची मालिकाच सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसैनिकांना मतदारयाद्या तपासण्याचे आदेश दिले आहेत.

advertisement

एकाच घरात तब्बल 119 मतदार

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस गावात एक अजब प्रकार उघडकीस आला आहे. एकाच घरात तब्बल 119 मतदारांची नोंद सापडलीय. छोट्याशा घरात 119 मतदारांची नोंदणी कशी होवू शकते, असा प्रश्न आता निर्माण झालाय. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मतदार यादीची तपासणी केल्यावर हा प्रकार उघड झाला. 119 मतदार बोगस तर नाहीत ना, अशी शंकाही उपस्थित झालीय.

advertisement

राज्यात चांदा ते बांदा मतदार यादीतील घोळ पाहायला मिळत आहेत. नालासोपारा विधानसभा मतदारसंघात माता जीवदानी चाळ इथल्या सुषमा गुप्ता या महिलेचं मतदार यादीत तब्बल सहा वेळा नाव असल्याचा प्रकार समोर आलंय. एकाच पानावर सुषमा गुप्ता यांचं नाव सहा वेळा असल्याचं पाहायला मिळतं.

नाशिकमध्ये बोगस मतदार

नाशिकमध्ये तर बोगस व्होटर आयडीच आढळून आले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी योगेश गांगुर्डेंनी हा पर्दाफाश केला. एकाच नावाने 3 बनावट मतदान कार्ड  पाहायला मिळत आहेत. सुनील रवींद्र वाजपेयी या मतदाराचे तीन वेगवेगळे कार्ड आहेत. पण वडिलांचं आडनाव मात्र चौधरी असं आहे. विवेक मुन्डले आणि योगेश काळुंगे ही नावं वेगळी आहेत, पण फोटो मात्र एकच आहे. विहंग परब याच्या वडिलांचं आडनाव वैद्य झालंय. आणि मिना कळमकर या महिला मतदाराच्या आयडीवर चक्क पुरूषाचा फोटा पाहायला मिळतोय.

advertisement

एकंदरीतच राहुल गांधींनी 7 ऑगस्ट रोजी दिल्लीत पत्रकार परिषद घेत, महाराष्ट्र आणि कर्नाटकात मतचोरी झाल्याचे आरोप केले होते. त्यानंतर मतदार यादीतील घोळांची मालिकाच सुरू झालीय. घोळांची ही मालिका विरोधकांच्या आरोपांना बळ देणारी आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानं या सर्व प्रकारावर खुलास करण्याची गरजे आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
SPECIAL REPORT: राहुल गांधींनी टाकला बॉम्ब, आता महाराष्ट्रात 4 ठिकाणी मतदार याद्यांमध्ये 'गोलमाल' उघड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल