Jalana News: जालना:जालन्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत जालना महानगरपालिकेचा आयुक्त असलेल्या संतोष खांडेकर यांना 10 लाखांची लाच स्विकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडण्यात आल्याची घटना घडली आहे. महानगरपालिका आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी गुरूवारी सांयकाळी ही कारवाई करण्यात आली.संतोष खांडेकर यांनी काँन्ट्रक्टरला 10 लाखाची रोकड घेऊन घरी बोलावलं होतं.त्यानंतर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्यांच्यावर कारवाई केली. या घटनेने जालन्यात खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे या कारावाईनंतर एसीबी कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तसेच या कारवाईने भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत.
advertisement
संतोष खांडेकर हे जालना महानगरपालिकेचा आयुक्त असून त्याने एका कॉन्ट्रॅक्टरकडे 10 लाखांच्या लाचेची मागणी केली होती.मात्र या तक्रारदार ही रक्कम देण्यास तयार नसल्यानं त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.या तक्रारीनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचळा होता. त्यानुसार आयुक्त संतोष खांडेकर यांनी संबंधित काँन्ट्रॅक्टरला लाचेची रक्कम घेऊन आपल्या शासकीय निवासस्थानी बोलावले होते. या घटनेची माहिती लाचलुचपत प्रतिबंध विभागाला देखील होती.त्यानुसार सापळा रचून संतोष खांडेकर यांना 10 लाखांची लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती.
विशेष म्हणजे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने आयुक्त संतोष खांडेकर यांना ताब्यात घेऊन एसीबी कार्यालयात आणल्यानंतर एसीबी कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी झाल्याचे देखील पहायला मिळाले.तसेच या कारवाईसोबत आता लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने संतोष खांडेकर यांच्या घराची झाडाझडती देखील घ्यायला सूरूवात केली आहे. आता या झाडाझडतीत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती काय लागते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या प्रकरणात संतोष खांडेकर हे भ्रष्ट अधिकारी होती.त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी होत्या पण कारवाई होत नव्हती अशी दबक्या आवाजात चर्चा होती.आता संतोष खांडेकर यांच्यावर कारवाई झाल्यानंतर त्यांच्या इतर शहरातील व नातेवाईकांची प्रॉपर्टीची चौकशी करण्याची मागणी जोर धरते आहे.
दरम्यान शहरातील आयुक्तांवरच कारवाई झाल्याने अधिकारी व कर्मचारी वर्गात खळबळ उडाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या कारवाईने भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत.
एसीबी कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी
दरम्यान, पालिका आयुक्त यांना ताब्यात घेऊन एसाबी कार्यालयात आणले. त्यानंतर एसीबी अधिकारी कार्यालयात पुढील कार्यवाही करत असताना कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी झाल्याचे देखील पहायला मिळाले. शहरातील आयुक्तांवरच कारवाई झाल्याने अधिकारी आणि कर्मचारी वर्गात खळबळ उडाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या कारवाईने भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत.
