अपघाताची तीव्रता इतकी होती की ट्रॅव्हल्सचा समोरील भाग अक्षरशः चुराडा झाला. धडक झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेत जखमींना बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात दाखवले.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले असून महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली आहे. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी चालकाचा ताबा सुटणे अथवा चालकाला झोपेची डुलकी लागल्याने अपघात झाला असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
advertisement
या भीषण अपघाताच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघातग्रस्त वाहन हटवण्यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Jun 04, 2025 7:57 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon Accident : अपघातात बसचा चुराडा, दोन ठार 15 जखमी, मुक्ताईनगरजवळ महामार्गावर भीषण अपघात
