जळगाव शहरात सायंकाळच्या सुमारास हॉटेलच्या बाहेर उभे असलेल्या दोन जणांमध्ये मद्यपी दूचाकी स्वारांमध्ये झालेल्या वादातून दोन्ही गटाच्या तरुणांकडून या परिसरात उभे असलेल्या नागरिकांना बेधुंदपणे लाकडाच्या डांक्याने मारहाण करण्यात आली. हॉटेलच्या बाहेर ठेवलेल्या झाडाच्या कुंड्या फोडून तोडफोड करण्यात आली.
या ठिकाणी दोन तरुणांमध्ये वाद झाला या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर दोन्ही तरुणांनी आपापल्याकडच्या तरुणांना बोलावलं. संबंधित दोही गटाच्या टवाळखुरांनी या परिसरातील हॉटेल नैवेद्य बाहेर तोडफोड करत सतरा ते अठरा नागरिकांना बेधुंदपणे मारहाण केली.
advertisement
टवाळखोरांनी केलेल्या मारहाणीत हॉटेल मालकासह चार ते पाच जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी भीतीने नागरिकांची पळापळ झाली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठले तसेच या ठिकाणी जमलेली गर्दी पांगवली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या घटनेचा तरुणांचा मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज आला समोर आला असून याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास सुरु आहे.
