काय आहे घटना?
भुसावळ तहसील कार्यालयातील गोदामात निवडणुकीसाठीचे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाच्या छतावर फटाक्यांचे रॉकेट पडल्यामुळे गोदामावरील टाकलेल प्लास्टिकचा कागद पेटल्याचा प्रकार घडला. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर तातडीने आग विझवण्यात आली. जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी भेट देत पाहणी केली.
वाचा - खेकड्यांच्या शिकारीसाठी गेले अन् स्वतःच शिकार झाले; सख्ख्या भावांचा मृत्यू
advertisement
भुसावळ तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये असलेल्या गोदामात निवडणुकीसाठी लागणारे ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले आहे. पाऊस गोदामात पडू नये म्हणून गोदामाच्या छतावर पत्रांवर प्लास्टिकचा कागद टाकण्यात आला आहे. मात्र, दिवाळी सणात कुणीतरी रॉकेट उडवल्यानंतर त्याची ठिणगी गोदामाच्या छतावर पडली व त्यामुळे आग लागली. पालिकेच्या अग्निशामन दलाला कळवताच काही वेळात बंबने ही आग विझवली.
