advertisement

Kolhapue Crime : खेकड्यांच्या शिकारीसाठी गेले अन् स्वतःच शिकार झाले; कोल्हापुरात सख्ख्या भावांचा धक्कादायक मृत्यू

Last Updated:

Kolhapue Crime : पन्हाळा तालुक्यात 2 सख्ख्या भावांचे मृतदेह धक्कादायक अवस्थेत आढळले आहे.

कोल्हापुरात सख्ख्या भावांचा धक्कादायक मृत्यू
कोल्हापुरात सख्ख्या भावांचा धक्कादायक मृत्यू
कोल्हापूर, 13 नोव्हेंबर (ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी) : गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सख्ख्या भावांचा अखेर शोध लागला आहे. दोघांचेही मृतदेह आढळल्याने कोल्हापुरात खळबळ उडाली होती. ओढ्याला खेकडे पकडायला गेलेल्या दोघा सख्ख्या भावांचा शिकऱ्यांनी शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या तारांमुळे मृत्यू झाला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील राक्षी येथे ही घटना घडली. चोरट्या शिकारीचं भिंग फुटू नये म्हणून पाच संशयितांनी मयत दोघा सख्ख्या भावांचे मृतदेह पावनगडावरून फेकून दिले होते.
पाोलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार वन्य प्राण्यांची तलावाच्या जवळ विजेचा शॉक देऊन चोरट्या शिकारी केल्या जातात. चोरट्या शिकारीचे भिंग फुटू नये म्हणून पाच संशयितांनी नुकत्याच घडलेल्या घटनेनंतर मृत दोघा सख्ख्या भावांचे मृतदेह पावनगडावरून खाली फेकून दिले होते. पोलीस आणि गावकऱ्यांच्या शोध मोहिमेत झुडपात फेकून दिलेल्या दोघा भावांचे मृतदेह आज सोमवारी हाती लागले. जोतिराम सदाशिव कुंभार (वय 64) आणि नायकू सदाशिव कुंभार (वय 60) अशी मृत दोघा सख्या भावांची नावे आहेत.
advertisement
त्यांचे नातेवाईक व गावकरी गेल्या चार दिवसांपासून त्यांचा शोध घेत होते. या प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. पन्हाळा विभागाचे पोलीस या घटनेची कसून चौकशी करीत आहेत. यात आणखी आरोपी आहेत का? कधीपासून अशी चोरटी शिकार सुरू आहे? याला प्रशासनाकडून काही पाठबळ मिळतंय का? अशा अनेक प्रश्नांची उकल होण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Kolhapue Crime : खेकड्यांच्या शिकारीसाठी गेले अन् स्वतःच शिकार झाले; कोल्हापुरात सख्ख्या भावांचा धक्कादायक मृत्यू
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement