advertisement

आत एक बाहेर एक असं अजितदादा कधीच..; उद्धव ठाकरेंच्या 'त्या' टीकेवर मुश्रीफांचा पलटवार

Last Updated:

उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा हसन मुश्रीफ यांनी जोरदार समाचार घेतला आहे.

News18
News18
कोल्हापूर, 12 नोव्हेंबर, ज्ञानेश्वर साळोखे : काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचं समोर आलं. मात्र त्यानंतर बरं  वाटल्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी अचानक दिल्ली दौरा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावर उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अजित पवार यांना चिमटा घेतला आहे. अजितदादांशी माझा संपर्क नाही, त्यामुळे त्यांना कोणता ताप आलाय माहिती नाही. त्यांना ताप आहे की, सहकाऱ्यांचा मनस्ताप असा टोला उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना लगावला होता. आता या टीकेला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले मुश्रीफ? 
अजित पवार यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार हे कधीही नाटक करणारे नेते नाहीत. आत एक आणि बाहेर एक असं अजित पवार वागत नाहीत. खरोखर अजित पवार हे आजारी होते असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे छगन भुजबळ यांचे देखील मत आहे. मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये असं त्यांचं म्हणणं आहे.
advertisement
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी जंयत पाटील यांना देखील टोला लगावला आहे. झोमॅटो असो किंवा स्विगी असो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचा आहे, आणि चिन्ह देखील आमच्याकडेच राहणार आहे. प्रतिज्ञापत्रं खरी की खोटी हे बोलण्याचा अधिकार कोणत्या नेत्याला नाही, तो निवडणूक आयोगाला आहे, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
आत एक बाहेर एक असं अजितदादा कधीच..; उद्धव ठाकरेंच्या 'त्या' टीकेवर मुश्रीफांचा पलटवार
Next Article
advertisement
Dharashiv ZP Election: आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन व
  • महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काका विरुद्ध पुतण्या' असा संघर्ष नवा राहिलेला न

  • आता याच संघर्षाची ठिणगी शिवसेना शिंदे गटात पडली आहे.

  • धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View All
advertisement