Thane : ट्रॅफिकच्या कटकटीतून ठाणेकरांची सुटका; मेट्रोच्या 'या' प्रकल्पांबाबत महत्त्वाचं अपडेट
Last Updated:
Thane Metro Update : मेट्रो4 आणि 4 अ च्या बाबतीत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे शिवाय मेट्रो–5सह विविध पायाभूत प्रकल्पांमुळे ठाणे परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
ठाणे : मुंबईसह उपनगरात मेट्रो प्रकल्पांचा वेगाने विस्तार होत आहे. ठाण्यात मेट्रो सुरू असून मेट्रो 4 आणि 4अच्या पुढील टप्प्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या प्रकल्पांबाबत नुकतीच महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
ठाणेकरांचा प्रवास होणार अधिक वेगवान
ठाणेकरांच्या प्रतीक्षेत असलेल्या मेट्रो4 आणि मेट्रो4अ या प्रकल्पांच्या यशस्वी चाचण्या पूर्ण झाल्या असून लवकरच या मेट्रो मार्गिका प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या मेट्रोमुळे ठाणे शहरातील दैनंदिन प्रवास अधिक सोयीचा, वेगवान आणि सुरक्षित होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मेट्रो 5 बाबतची ही मोठी अपडेट
यासोबतच मेट्रो-5 प्रकल्पामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि नवी मुंबई ही महत्त्वाची शहरे एकमेकांशी जोडली जाणार आहेत. त्यामुळे औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्राला चालना मिळणार असून रोजगाराच्या संधीही वाढतील अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
advertisement
ईस्टर्न फ्रीवे, कोस्टल रोडसह वाहतूक सुलभीकरणाचे काम जोरात
ठाणे आणि मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अनेक महत्त्वाचे प्रकल्प वेगाने सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग, कल्याण-बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका, ईस्टर्न फ्रीवेचा विस्तार, कोस्टल रोड तसेच ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. या सर्व प्रकल्पांमुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 9:09 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Thane : ट्रॅफिकच्या कटकटीतून ठाणेकरांची सुटका; मेट्रोच्या 'या' प्रकल्पांबाबत महत्त्वाचं अपडेट










