अजितदादांना धक्का
जळगावच्या महिला मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते अजित पवार गटातील युवक कार्यकारिणीतील 20 जणांनी शरद पवार गटात प्रवेश केला. मंत्री अनिल पाटील वेळ देत नसल्याने तसेच कार्यकर्त्यांची कुठलीही कामे नसल्याने नाराजी होती. त्यामुळे शरद पवार गटात प्रवेश केल्याचे युवक पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अजित पवार गटाचे युवक कार्याध्यक्ष साहील पटेल, युवक शहर जिल्हाध्यक्ष सुशील शिंदे, विधानसभा क्षेत्र प्रमुख युवक रफिक पटेल, युवक उपाध्यक्ष अमर येवले यांच्यासह 20 जणांनी अजितदादांना सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला.
advertisement
वाचा - वादग्रस्त रामगिरी महाराज-मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर जितेंद्र आव्हाड संतापले
अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर युवक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांना सोडून अजित पवार गटात प्रवेश केला होता. अजित पवार गटात गेलेले सर्व युवक पदाधिकारी 9 महिन्यानंतर पुन्हा शरद पवार गटात परतले आहेत. एक निष्ठावंत राहून सुद्धा कुठल्याही पदाधिकारी व कार्यकत्याच्या समस्या आपल्या पक्षाचे मंत्रीअनिल भाईदास पाटील यांनी सोडविल्या नाही. याच कारणामुळे अजित पवार गटातील पदाचा राजीनामा देऊन शरद पवार गटात प्रवेश केला असल्याचे युवक पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
