advertisement

ramgiri maharaj controversy : वादग्रस्त रामगिरी महाराज-मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर जितेंद्र आव्हाड संतापले; म्हणाले..

Last Updated:

ramgiri maharaj controversy : वादग्रस्त रामगिरी महाराजांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतल्याने पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे.

'...नाहीतर सलमानसारखाच गेम करू', राहुल गोडारची जितेंद्र आव्हाडांना धमकी
'...नाहीतर सलमानसारखाच गेम करू', राहुल गोडारची जितेंद्र आव्हाडांना धमकी
ठाणे, (अजित मांढरे, प्रतिनिधी) : सरला बेटाचे महंत मठाधिपती रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील एका कार्यक्रमामध्ये मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त विधान केलं. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक जिल्ह्यात याचे पडसाद उमटत आहेत. नाशिक परिसरात तर दोन गटात तुफान दगडफेकीची घटना घडली. धक्कादायक म्हणजे ज्या महाराजांच्या वक्तव्याने हे सर्व घडलं त्या रामगिरी महाराजांची काही तासांतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते ठाणे येथे माध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
आव्हाड म्हणाले, की अभंग विविध जाती धर्माच्या संतांनी लिहिल आहेत. जे विठ्ठलाचे परमभक्त आहेत. त्यांनी कधीच जातीभेद धर्मभेद केला नाही. परमेश्वराशी बोलायला आपल्याला कोणाची गरज नाही. आपण थेट परमेश्वरासोबत बोलू शकतो. एखाद्या संतांनी एखादा धर्माविषयी बोलणं हे निषेधार्थ आहे. यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दंगली घडवून आणायच्या आहेत. निवडणुका देखील त्याच कारणामुळे पुढे ढकलल्या आहेत की त्यांना यश मिळणार नाही. मुंब्रामध्ये मुस्लिम बांधवांना शांत केलं. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. राबोडीच्या दंगलीमध्ये मी जर मध्ये पडलो नसतो तर संपूर्ण मुंबई दुसऱ्या दिवशी पेटली असती.
advertisement
मुख्यमंत्री कोणाचं समर्थन करतात हे मला माहित नाही. परंतु दुर्दैवाने अशी आग लावणाऱ्यांचे समर्थन ते करतात हे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. सामाजिक सलोखा राहायला हवा. मुख्यमंत्र्यांनी संविधानिक जबाबदारी घेतली पाहिजे. दोन्ही समाजाला एकत्र करायला हवं. त्यांना दिसते ओबीसी मराठा आपल्याबरोबर नाही. समाजामध्ये आपला विषयी प्रचंड राग आहे. आपण जे काही राजकीय वातावरण उठवलं आहे. सांस्कृतिक राजकीय संस्कृती त्याचा आपण वाटोळं केलं आहे. त्याला उपाय एकच हिंदू मुसलमान वाद.
advertisement
वाचा - गद्दारांना 50 खोके आणि लाडक्या बहिणीला 1500; उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका
नितेश आणि जे काही बोलतात ते सरकारच्या परवानगीशिवाय बोलतात का? सरकार त्याची दखल घेत नाही. याचा अर्थ त्यांना सरकारच समर्थन आहे का? सत्ता येते जाते. पण एकदा मनं दुभंगली की ती परत जोडता जोडता आयुष्य निघून जाते. सत्ता आहे, अंतिम ध्येय नाही. आयुष्यात आपण राजकीय अरुणात आलो म्हणजे बसायला हवं हे गणित नाहीये आपण लोकांची मन जोडायला हवी, असा सल्लाही आव्हाड यांनी दिला.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
ramgiri maharaj controversy : वादग्रस्त रामगिरी महाराज-मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर जितेंद्र आव्हाड संतापले; म्हणाले..
Next Article
advertisement
Budgetमधील मोठी बातमी, 75 वर्षांत पहिल्यांदाच असं होणार; एका बदलामुळे अर्थतज्ज्ञही चक्रावले, उद्या काय घडणार?
Budgetमधील मोठी बातमी, पहिल्यांदाच असं होणार; एका बदलामुळे अर्थतज्ज्ञही चक्रावले
  • यंदाच्या बजेटमध्ये मोठा 'ट्विस्ट'

  • देशाची दिशाच बदलणार

  • 'Part A' नाही तर 'Part B' करणार धमाका

View All
advertisement