देशात सुवर्ण नगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर 70 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. जळगावच्या सराफ बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर 68 हजार रुपये एवढे असून जीएसटी सह हे दर 69 हजार 900 रुपयांवर पोहोचले आहेत.
Gold : सोन्यावर का लिहिलेलं असतं 999? तुमच्यापैकी 99 टक्के लोकांना नसेल माहित
advertisement
एक ते दोन दिवसात सोन्याच्या दारात 1 हजार रुपयांपर्यंत वाढ झाल्यामुळे सोन्याचे दर हे जीएसटी सह 69 हजार 900 रुपयांवर पोहोचले आहेत. जळगावातील सराफ व्यवसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याची आजचा भाव विक्रमी भाव असून सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच 70 हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याच सराफ व्यावसायिकांचे म्हणणं आहे.
दरम्यान सोन्याच्या विक्रमी भाववाढीमुळे ऐन लग्न सराईचे दिवस असल्याने नागरिकांना खिशाला मोठी झळ बसणार असून लग्नात दागिन्यांची हौस करणाऱ्या महिलांचे बजेट कोलमडणार आहे.
