TRENDING:

SSC Exam Copy :रिक्षात बसून SSC विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार केली, मुख्याध्यापिका, शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

Last Updated:

SSC Examination Copy Center : जळगावमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर रिक्षा बसून कॉपी करणाऱ्या मुख्यध्यापिका, शिक्षकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय वाघमारे, प्रतिनिधी, जळगाव: विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन त्यांच्यावर सत्य, प्रामाणिकपणाचे संस्कार करावे अशी अपेक्षा शिक्षकांकडून करण्यात येते. मात्र, जळगावमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर रिक्षा बसून कॉपी करणाऱ्या मुख्यध्यापिका, शिक्षकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिक्षकांचाच कॉपीत सहभाग असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
News18
News18
advertisement

जळगावच्या यावल तालुक्यातील किनगाव येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर सुरू होता. यावेळी विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी केंद्राबाहेर एका रिक्षात बसून कॉपी तयार करणाऱ्या मुख्याध्यापिका, शिक्षक आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरलनंतर झाल्यानंतर झालेल्या कारवाईमुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत यावल पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी तक्रार दिली आहे.

advertisement

किनगाव येथील नेहरू माध्यमिक विद्यालय केंद्रावर सकाळी इयत्ता दहावीचा मराठी द्वितीय व तृतीय विषयाचा पेपर सुरू होता. एका ऑटो रिक्षात सरदार वल्लभभाई पटेल स्कूलच्या मुख्याध्यापिका शिला तायडे आणि तेथील शिक्षक अमोल भालेराव व त्यांच्यासोबत आशा पटेल असे तिघेजण कॉपी पुरवण्याच्या उद्देशाने अपेक्षित प्रश्नसंचातून प्रश्नोत्तरे पाहून कॉपी बनवत होते. याबाबत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला झाला. त्यानुसार यावल पोलीस ठाण्यात मुख्याध्यापिका शिला तायडे, शिक्षक अमोल भालेराव, आशा युसूफ पटेल या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
1854 पासूनची सर्व टपाल तिकीट, छ. संभाजीनगरमध्ये भरलंय प्रदर्शन, काय आहे खास?
सर्व पहा

दरम्यान, संबंधित शिक्षकांच्या मोबाईलवर प्रश्नपत्रिका कशी आली?, प्रश्नपत्रिका आणखी इतर कुणाच्या मोबाईलवर पाठविण्यात आली होती का?, या प्रकरणात संस्थेचा काही संबंध आहे का? या सर्व बाबींचा यावल पोलीस तपास करणार आहेत. तसेच या प्रकरणात आणखी काही आरोपींची नावे वाढण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
SSC Exam Copy :रिक्षात बसून SSC विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार केली, मुख्याध्यापिका, शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल