ईडीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं की, जळगाव येथील माजी खासदार ईश्वरलाल जैन आणि माजी आमदार मनीष जैन यांच्या मालकीच्या राजमल लखीचंद आणि मानराज नावाने असलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांनी बँकांकडून कर्ज घेतल होते. यावेळी १,२८४ किलो दागिन्यांचा माल नजर गहाण ठेवला होता. प्रत्यक्षात त्यांच्याकडे ३९.३३ किलो वजनाचेच दागिने आढळले आहेत. त्यातही तीन आरोपींच्या कंपन्यांमधील माल साठा २०२२-२३ या आर्थिक वर्षात शून्य दाखवल्याचा गंभीर आरोप सक्तवसुली संचालनालयाने जारी केलेल्या पत्रकात केला आहे.
advertisement
नवाब मलिक अजितदादांना पाठिंबा देणार? भुजबळांच्या सूचक वक्तव्यानंतर चर्चेला उधाण
शिवाय मोबाइल फोनमध्ये विदेशी गुंतवणुकीसंदर्भात संशयास्पद कागदपत्रे आढळल्याचे ईडीने म्हटले आहे. सक्तवसुली संचालनालयाने
१७ व १८ ऑगस्ट रोजी आर. एल. ज्वेलर्ससह मे. राजमल लखीचंद ज्वेलर्स, मे. आर. एल. गोल्ड आणि मे. मानराज ज्वेलर्स आणि त्यांचे प्रवर्तक
ईश्वरलाल जैन ललवाणी, मनीष जैन ललवाणी, श्रीमती पुष्पादेवी आणि श्रीमती नीतिका मनीष जैन यांच्या मालकीच्या जळगाव, नाशिक व ठाणे येथे १३ ठिकाणी हे छापे मारले.
हिशेब पुस्तकात खरेदी-विक्रीचे खोटे व्यवहार नोंदवले
'ईडी'ने म्हटले आहे की, जैन कुटुंबीयांनी भागीदारी संस्थेच्या हिशेबपुस्तकांमध्ये खरेदी-विक्रीचे खोटे व्यवहार नोंदवले आहेत. १२८४ किलो दागिन्यांच्या मालावर ३५२.४९ कोटी रु. कर्ज घेतले. माल नजरगहाण असताना केवळ ३९.३३ किलो दागिने आढळून आले आहेत. २००३ ते २०१४ या काळातील हे कर्ज असून त्या काळातले हिशेब पुस्तके मुद्दाम ठेवली नाहीत, असे त्यांनी मान्य केल्याचेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
