मोदींना पहिल्यांदा शिवसेनेचा पाठिंबा
भाजपने ज्यावेळी मोदींच नाव पंतप्रधान पदासाठी जाहीर केलं. त्यावेळी सर्वात अगोदर शिवसेनेने पाठिंबा दिला होता. भाजपच्या डोक्यावर सर्वच बसत आहे. मिंदे गट, अजित पवार आणि आता अशोक चव्हाण बसले. भ्रष्टाचार करणारे सर्वच भाजपमध्ये बसत आहेत. भाजपची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. सर्व सामान्य जनतेला मोदींपेक्षा उद्धव ठाकरे जवळचे वाटत आहेत. आजही मी शिवसेनेचा पक्ष प्रमुखच असल्याचे ठाकरेंनी सांगितले.
advertisement
घराणेशाहीवरुन शाहांना घेरलं
शेतकऱ्यांची घरेची घरे संपविणारे घराणेशाही संपविणार असल्याची भाषा करत आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ही जनता ठरवेल. मात्र, अमित शहाजी तुम्ही मुलाला क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष केलं. ती घराणेशाही नाही का? वर्ल्ड कपचा अंतिम सामना पण तिकडे घेऊन गेले होते. मोदी, अमित शाह आणि फडणवीस यांनी आपल्या वडिलांचे कर्तृत्व सांगावे. 10 वर्षे आम्ही मोदींना तिथं पंतप्रधान पदी बसवलं. आम्ही मोदींच्या नावाने मत मागितली होती. त्यावेळी आमची युती होती. पण तुम्हीही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मत मागितली, आताही मत मागत आहात. अजित पवार यांनी सिंचन घोटाळा केला, अशोक चव्हाण यांनी आदर्श घोटाळा केला. हा जनादेशचा अपमान नाही का?
मोदींना मी सांगतोय सोयाबीन, कापूसला भाव नाहीत. भाजपच्या या वृत्तीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. 40 लाख कोटींच कर्ज तुम्ही उद्योजकांचे माफ करता. मग शेतकऱ्यांनी काय घोड मारलं? भाजप किती लुटत आहे. जनता काही आंधळी नाही. केंद्र सरकारला गुडघ्यावर बसविण्याची ताकद आपल्यात आहेत. तुम्ही गद्दारी का केली? मी असं काय केलं होतं? गुजरात समृद्ध होत असेल तर जरूर करा. मात्र, महाराष्ट्राचे प्रकल्प नेऊ नका. मत द्यायचे आम्ही आणि महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला नेणार.
वाचा - माझं काही चुकलं का? मनोज जरांगे झाले व्यथित, बारस्करांचा ते प्रकरण काढलं बाहेर
उद्धव ठाकरे जे बोलतो ते करून दाखवतो. त्यासाठी पंतप्रधान मोदी येत आहेत. शेतकरी गरीब आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. आता ही लढाई माझी एकट्याची नाही आपल्याला सोबत लढायची आहे. दिलेल्या वचनाला जगला असता तर ही वेळ आली नसती. भाजपची दशा झाली आहे. दिलेलं वचन पाळलं असतं तर इतके तुकडे झाले नसते. काय मिळालं तुकडे करून? असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला.
