Manoj Jarange Patil : माझं काही चुकलं का? मनोज जरांगे झाले व्यथित, बारस्करांचं ते प्रकरण काढलं बाहेर

Last Updated:

Manoj Jarange Patil : संगिता वानखेडे आणि अजय बारस्कर यांनी केलेल्या आरोपांवर मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

मनोज जरांगे
मनोज जरांगे
जालना, (रवी जैस्वाल, प्रतिनिधी) : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर संगीता वानखेडे आणि अजय बारस्कर या सहकाऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत. जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचं पाठबळ असल्याचा दावा वानखेडे यंनी केला होता. तर अजय बारस्कर यांनीही जरांगेंवर गंभीर आरोप केले होते. या सर्व आरोपांना आता जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. प्रत्येकाला प्रसिद्धीची हाव आहे, प्रत्येकाला सरकारचा पैसा लागतो, असं म्हणत संगिता वानखेडेंनी उत्तर दिलं. तर अजय बारस्करांचे महिलेवर अत्याचार केल्याचं प्रकरण काढलं आहे.
आरोपांमुळे जरांगे व्यथित
मनोज जरांगे पाटील यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे ते व्यथित झालेले पाहायला मिळाले. अजय बारस्कर हा विकत घतलेला व्यक्ती असून तो ट्रपमधील असल्याचा आरोपी जरांगे पाटील यांनी केला. जरांगे म्हणाले, की मी काय वाईट केलं? 57 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं. याचा फायदा दीड कोटी मराठा समाजाला होणार आहे. मागास वर्ग आयोग गठीत करण्यात आला. 10 टक्के आरक्षण या आंदोलनामुळे मिळालं. ही माझी चूक आहे का? लोकांचे 33/34 तपासायला लावले. माझा मराठा समाज एक केला. यात मी नाव ठेवण्यासारखं केलं काय? जनतेला मायबाप मानायला लागलो.
advertisement
तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागायला पाहिजे का? तू महिलांवर बलात्कार करतो. असे तुझेच गाववाले सांगत आहेत. हा संपूर्ण ट्रॅप आहे. ह्यात सरकार सहभागी असल्याशिवाय घडू शकत नाही. एका महिलेच्या विनयसंभागच प्रकरण दाबलं गेलं. ते उघड करू. नाहीतर तू जरांगेच्या विरोधात बोल, असं धमकावलं गेलं. तो कोण आहे? त्याला आम्ही मोजीतही नाही. ज्याला सोशल मीडियावरही कोणी विचारत नाही, त्याच्या एकएक तासाच्या मुलाखती चॅनेलवर दाखवल्या जातात. हे सर्व सरकारचा हात असल्याशिवाय होऊ शकतं का? अशी शंका जरांगे पाटील यांनी उपस्थित केली.
advertisement
संगिता वानखेडेंच्या आरोपाला प्रतिउत्तर
मात्र थेट आरोपांवर जरांगेंनी उत्तर देणं टाळलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप संगिता वानखेडे यांनी केला होता. याला उत्तर देताना तसल्यांना किंमत द्यायची नाही. समाज महत्वाचा आहे. प्रत्येकाचं उत्तर देत बसलं तर माझं आंदोलन कुठं जाईल. त्यामुळं ते सोडूनच द्या आता यांच्यावर उत्तर देणारच नाही असं जरांगे यांनी म्हंटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Manoj Jarange Patil : माझं काही चुकलं का? मनोज जरांगे झाले व्यथित, बारस्करांचं ते प्रकरण काढलं बाहेर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement