Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंना इतका राग का आला? वृत्तवाहिन्यांवरच आगपाखड, निवडणूक आयोगालाही आव्हान

Last Updated:

Manoj Jarange Patil Vs Ajay Maharaj Baraskar : मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांच्याच सहकाऱ्यांनी गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील
मुंबई : राज्य सरकराने 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण देणारे विधेयक एकमताने मंजूर केलं. यानंतर मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. अशात मनोज जरांगे पाटील यांनी आम्हा कुणबीतूनच आरक्षण द्या अशी मागणी करत पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करणारे त्यांच्याच सहकाऱ्याचे व्हिडीओ समोर आले. जरागेंच्याविरोधात बोलणाऱ्यांच्या बातम्या दाखवल्यानं जरांगेंनी वृत्तवाहिन्यांवर आगपाखड केली. यासोबतच निवडणूक आयोगालाही त्यांनी आव्हान दिलं आहे.
जरांगे का झाले आक्रमक?
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळाल्यानंतरही आता मनोज जरांगे पुन्हा चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावेळी मात्र सरकारसह वृत्तवाहिन्या आणि थेट निवडणूक आयोगावर आक्रमक होत थेट निवडणूक आयोगाला मनोज जरांगेंनी आव्हान दिलं आहे. जरांगेंचे एकेकाळचे समर्थक अजय बारस्कर आणि संगीता वानखेडे यांनी जरांगेंवर घणाघाती आरोप केल्यानंतर जरांगे चांगलेच खवळले आहेत. मनोज जरागेंच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या बातम्या दाखवल्यानं जरांगेंनी वृत्तवाहिन्यांवरही आता आरोप करणं सुरू केलंय. मात्र इथं हे नमूद करण्याची गरज आहे की मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू झाल्यापासून आणि त्यांच्या सभा दौरे सुरू झाल्यापासून जरागेंच्या सभा लाईव्ह दाखवा म्हणून राज्यभरातून जरांगेंच्या समर्थकांनी प्रत्येक वृत्तवाहिनीच्या संपादकांना अनेक फोन केले. वृत्तवाहिन्यांनी जरांगेंची प्रत्येक सभा, आंदोलन, पत्रकार परिषद दाखवली. मात्र, आता जरांगेंनी आपला मोर्चा वृत्तवाहिन्यांकडे वळवल्याचं दिसतंय. इतकंच नाही तर आता जरांगे आक्रमक होत निवडणूक आयोगालाही त्यांनी इशारा दिला. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत निवडणूक घेऊ नका, असं थेट आव्हान त्यांनी दिलंय. नेत्यांनाही गावात प्रचारासाठी फिर देऊ नका, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे आता जरांगे वेगळ्या भूमिकेत गेलेत का? असा सवाल उपस्थित होतोय.
advertisement
आंदोलनात फूट?
मराठा समाजाला राज्य सरकारने 10 टक्के आरक्षण जाहीर केल्यानंतरही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे उपोषण सुरू आहे. दरम्यान, या आंदोलनात (Maratha Andolan) आता फूट पडली आहे. मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी अजय बारस्कर यांच्यानंतर आता एका महिला सहकाऱ्याने गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटील हे हेकेखोर असल्याचं महिला सहकारी संगिता वानखेडे यांनी म्हटलं. आतापर्यंत समाजासाठी (Maratha Samaj) आपण गप्प बसलो होतो असं संगिता वानखेडे यांनी म्हटलं.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंना इतका राग का आला? वृत्तवाहिन्यांवरच आगपाखड, निवडणूक आयोगालाही आव्हान
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement