Maratha Reservation : बारस्करांनंतर एका महिला सहकाऱ्याने जरांगेंवर केले खळबळजनक आरोप

Last Updated:

Sangita Wankhede On Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील हे हेकेखोर असल्याचं महिला सहकारी संगिता वानखेडे यांनी म्हटलं. आतापर्यंत समाजासाठी आपण गप्प बसलो होतो असं संगिता वानखेडे यांनी म्हटलं.

News18
News18
पुणे : मराठा समाजाला राज्य सरकारने १० टक्के आरक्षण जाहीर केल्यानंतरही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे उपोषण सुरू आहे. दरम्यान, या आंदोलनात (Maratha Andolan) आता फूट पडली आहे. मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी अजय बारस्कर यांच्यानंतर आता एका महिला सहकाऱ्याने गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटील हे हेकेखोर असल्याचं महिला सहकारी संगिता वानखेडे यांनी म्हटलं. आतापर्यंत समाजासाठी (Maratha Samaj) आपण गप्प बसलो होतो असं संगिता वानखेडे यांनी म्हटलं.
संगिता वानखेडे म्हणाल्या की,समाज बऱ्याच वर्षांनी एकत्र आलाय. काही गोष्टी घडत होत्या पण समाजासाठी त्याकडे दुर्लक्ष केलं. जरांगेंच्या चुकीच्या गोष्टी लक्षात येत होत्या. सर्व पक्षाचे नेते अंतरवाली सराटी इथं गेले होते. पण कुठल्याच नेत्याला मनापासून बोलले नाहीत. वेगळाच टेंभा होता. पण शरद पवारांबाबत प्रेम उफाळून आलं. जो माणूस आरक्षणाच्या विरोधात होता तोसुद्धा आमच्यासोबत आलाय मग तेही कानामागे टाकलं. पण ज्या वेळी मुलांवर केसेस होत होत्या. साबळेंनी गाड्या फोडल्या. नामदेवराव जाधवांवर शाईफेक झाली.
advertisement
मला ट्रोल केलं गेलं. ओबीसी कार्यकर्त्यांनी ट्रोल केलं, विषाची बाटली घेऊन कॅमेरासमोर बसली होती. तर त्याबद्दल एक शब्द तरी बोलायचा होता. छगन भुजबळांच्या विरोधात गेले. मला फोन वरून गलिच्छ बोललं जात होतं. माझ्यासाठी थोडंस बोला असं म्हणणं होतं. पण ते म्हणाले की मी त्या बाईला सांगितलं नाही आणि तिला मोठं करायला बसलो नाही असं जरांगे बोलल्याचं संगिता वानखेडे म्हणाल्या.
advertisement
मी मोठं करा म्हटलंच नव्हतं. मला गलिच्छ बोललं जात होतं. आया बहिणींची अब्रू वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. आज तुम्ही तुमच्याच आया बहिणींचे कपडे काढायला लावतात. मी जरांगेंच्या विरोधात बोलायला सुरुवात केली तेव्हा कार्यकर्त्यांनी गलिच्छ बोलायला सुरुवात केली. जरांगे मनापासून समाजासाठी काही करत असती तर विनाकारण आंदोलनाला बसलाच नसता. पुन्हा उपोषण कशासाठी? आरक्षण मिळालं ना? कायद्यात टिकून राहणारं आरक्षण मिळालं ना? स्वतंत्र आरक्षण मिळालं. अट्टाहास कशासाठी? समाज वेडा नाही आणि समाजाच्या लक्षात या गोष्टी आलेल्या आहेत असंही संगिता वानखेडे यांनी सांगितलं.
advertisement
जरांगेंच्या भूमिका बदलायच्या तेव्हा मी त्यांना असं ऐकलंय असं सांगायचे. पण काही गोष्टी अशा लक्षात यायच्या की कुठून खर्च होतोय. मी सहकाऱ्यांना सांगायचे तर ते म्हणायचे ताई जाऊदे, शांत व्हा, आपल्याला आरक्षणाशी मतलब आहे. ज्याने विरोध केला तोच खर्च करत असेल तर इथेच आपण जिंकलो ना. त्यामुळे मी मूग गिळून गप्प बसले. मनोज जरांगे पाटील हे थेट बोलायचे नाहीत. जरांगेंना निरोप दिले जायचे. अर्धा मिनिट बोला अशी विनंती केली. तेव्हा मी कुणाला मोठं करायला मोकळं नाही असं म्हणाल्याचं संगिता वानखेडे म्हणाल्या.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Maratha Reservation : बारस्करांनंतर एका महिला सहकाऱ्याने जरांगेंवर केले खळबळजनक आरोप
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement