Manoj Jarange : व्हायरल क्लीप मीसुद्धा पाहिली; बारस्करांच्या आरोपानंतर मंत्री भुजबळांची जरांगेंवर टीका

Last Updated:

जरांगे पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर देताना बारस्कर यांच्यावर गंभीर आरोप केलेत. दरम्यान, यात मंत्री छगन भुजबळ यांनीही उडी घेतली असून त्यांनी जरांगेंवर टीका केलीय.

News18
News18
मुंबई : मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावर त्यांचा जुना सहकारी अजय महाराज बारस्कर यांनी आरोप केले आहेत. या आरोपानंतर जरांगे पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर देताना बारस्कर यांच्यावर गंभीर आरोप केलेत. दरम्यान, यात मंत्री छगन भुजबळ यांनीही उडी घेतली असून त्यांनी जरांगेंवर टीका केलीय. बारस्कर यांची बाजू घेत जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. जरांगेंनी पुकारलेल्या आंदोलनावरही टीका करताना विनाकारण गावबंद करा असं म्हणत असल्याचं भुजबळ म्हणाले. वयस्कर लोकांना उपोषणाला बसा म्हणताय पण त्यांना काही झाले तर काय? असा प्रश्नही भुजबळांना विचारला.
मनोज जरांगे पाटील आणि अजय बारस्कर यांच्यात सध्या वाकयुद्ध रंगलंय. बारस्कर यांनी केलेल्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांनीही काही आरोप केले आहेत. तर छगन भुजबळ या प्रकरणावर म्हणाले की, "बारस्कर यांची व्हायरल क्लिप मी पाहीली होती त्यांना धरून विधान सभेत बोललो होतो. बारस्कर हे २००६ पासुन मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा लढतायत. ते जरांगे सोबत असायचे आणि त्यांच्या गुप्त बैठका, बेताल वक्तव्ये याला कंटाळून ते बोलतायत." उपोषण सोडण्यासाठी पाणी देत असताना मनोज जरांगे पाटील यांनी मी मोठा होईल म्हणून माझ्या हातून पाणी पिण्यास नकार दिल्याचा दावा अजय बारस्कर यांनी केला होता. मनोज जरांगे पाटील आणि अजय बारस्कर यांचा स्टेजवरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
advertisement
जरांगेना काही कळत नाही विनाकारण गावबंद करा म्हणताय वयस्कर लोकांना उपोषणाला बसवताय त्यांना काही झाले तर? सर्व बाबतीत सरकार सकारात्मक विचार करत आहे. परंतु गैरसमज निर्माण केला जातोय. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी ते वाटेल ते बोलतात. १० तारखेला उपोषण बाबत समाजातील लोकांना विचारले नव्हते. श्रेयवादासाठी स्वतः:हुन हे उपोषणाला जाऊ बसले असंही भुजबळ म्हणाले.
advertisement
सरसकट आरक्षण देता येणार नाही सगेसोयरे हा शब्द कायद्याच्या चौकटीत बसणारा नाही. कोर्टात याला विरोध होणार आहे. मराठा मतं जरांगे यांनी भडकवतील ते आपली मते विरोधात जातील म्हणून सावध भुमिका घेतली जात आहे. जर वयस्कर लोकांच्या जीवाला काही झाले तर पोलिसांनी जरांगे यांना कारणीभूत धरलं पाहिजे बारावी परीक्षा सुरू हे रस्ते बंद करतात त्यांना जनतेसाठी काही वाटत नाही प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी हे रस्त्यांवर उतरा सांगतात असंही भुजबळ म्हणाले.
advertisement
जरांगेंचे अजय बारस्करांवर गंभीर आरोप
अजय महाराज बारस्कर यांच्यावर गंभीर आरोप करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, त्याच्या गावातले म्हणतात याने बलात्कार केलेला आहे. एका नेत्यामुळं हा वाचला आहे. मला अक्कल नाही तर दीड करोड मराठ्याला आरक्षण कसं मिळालं. तुझी सासरवाडी कुठली आहेय़ लोकं सगळे काढायला लागले आहेत. तु सरकारची सुपारी घेतलेली आहे.
advertisement
तुकोबारायांच्या अपमान केल्याचं सांगत अजय बारस्कर यांनी जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले होते. त्यावरून मनोज जरांगे पाटील म्हणाले की, तुकाराम महाराजांचं नाव घेवून आडून बोलू नकोस. मी तुकाराम महाराजांचा एक छोटा भक्त आहे. तु जर कुटुंबाबद्दल बोलला तर सुट्टी नाही. याला बच्चू कडू संपवायचे आहेत का?? या असल्या बांडगुळ्यामुळं सरकारला डाग लागतोय. किती भंगार हाताखाली धरून सरकारनं ट्रॅप रचला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange : व्हायरल क्लीप मीसुद्धा पाहिली; बारस्करांच्या आरोपानंतर मंत्री भुजबळांची जरांगेंवर टीका
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement