Jarange vs Baraskar : गावातले म्हणतात बलात्कार केलेला, नेत्याने वाचवला; जरांगे पाटलांचे बारस्करांवर आरोप
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
Manoj Jarange Patil on Ajay Maharaj Baraskar Allegation : मनोज जरांगे पाटील यांनी अजय महाराज बारस्कर यांनी केलेल्या आरोपांनंतर कठोर शब्दात प्रहार केले आहेत.
रवी जयस्वाल, जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे. दरम्यान, यात आता त्यांचे जुने सहकारी असलेल्या अजय महाराज बारस्कर यांनी गंभीर असे आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटील हे पलटी मारतात. त्यांनी तुकोबारायांचा अपमान केला आणि ते मराठ्यांचं नुकसान करत असल्याचं अजय बावस्कर यांनी म्हटलं. आता यानंतर जरांगे पाटील यांनी अजय महाराज बारस्कर यांच्यावर कठोर शब्दात प्रहार केले.
जरांगे पाटील म्हणाले की, महाराज लावून घ्यायला त्याला लई नियतवान महाराज लागतो. संत तुकाराम महाराजांबद्दल वाईट शब्द गेला तर काही बोलून गेलो असेल. पण तु आम्हाला शिकवू नकोस. तु मोठा होण्यासाठी आला होता का? हे सगळे नियोजित आहे. लोकं म्हणाले की चाळीस लाख घेतले असा आरोपही जरांगे पाटलांनी केला. यावेळी जरांगे पाटील यांनी बारस्कर महाराजांना शिवीगाळही केली.
advertisement
अजय महाराज बारस्कर यांच्यावर गंभीर आरोप करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, त्याच्या गावातले म्हणतात याने बलात्कार केलेला आहे. एका नेत्यामुळं हा वाचला आहे. मला अक्कल नाही तर दीड करोड मराठ्याला आरक्षण कसं मिळालं. तुझी सासरवाडी कुठली आहेय़ लोकं सगळे काढायला लागले आहेत. तु सरकारची सुपारी घेतलेली आहे.
तुकोबारायांच्या अपमान केल्याचं सांगत अजय बारस्कर यांनी जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले होते. त्यावरून मनोज जरांगे पाटील म्हणाले की, तुकाराम महाराजांचं नाव घेवून आडून बोलू नकोस. मी तुकाराम महाराजांचा एक छोटा भक्त आहे. तु जर कुटुंबाबद्दल बोलला तर सुट्टी नाही. याला बच्चू कडू संपवायचे आहेत का?? या असल्या बांडगुळ्यामुळं सरकारला डाग लागतोय. किती भंगार हाताखाली धरून सरकारनं ट्रॅप रचला आहे.
advertisement
Ajay Baraskar : जरांगेंचे आधीचे सहकारी, जरांगेंचे आताचे विरोधक का झाले? बारस्करांची Exclusive मुलाखत
अजय बारस्कर हा विनाकारण नावाखाली पैसे जमा करत आहे. बच्चू भाऊंनी इतकी नालायक कसे घेतले. महाराज नावाला याने डाग लावायचा नाही, कुटुंबाबद्दल बोलायचं नाही, मग मला आंदोलन काही कळणार नाही. ज्या महिलेला न्याय मिळाला नाही, ते कोणत्या नेत्यामुळे तिनं येवून सांगावं तिला न्यायचं मिळेल असंही जरांगे पाटील म्हणाले.
advertisement
मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की, कोणत्या तरी संस्थानच्या नावाखाली 3 कोटी रुपये कमावलेत. एका गावातून बीसी घेवून पळून गेलाय. तु तुकाराम महाराज शब्दासाठी डागलं आहे. मात्र त्याला तुकाराम महाराजांच्या नावाखाली सहानुभुती घेवून मरायचं आहे. आम्ही वारकरी संप्रदायाला मानतो. मी वारकर्यांच्या हस्ते पाणी पिलं आहे.
संतांबद्दल वाईट शब्द गेले तर मी नाक घाशील. एका सेकंदात जर काही झालं तर मी माफी मागितली. उपोषण सुटल्यावर मी पश्चाचाप पण करेल. तु नाटकं करू नको. माझ्या कुटुंबानं किती त्रास भोगला हे माहिती आहे. माझ्या कुटुंबाबद्दल काही बोलला तर तुला सुट्टी नाही असा इशाराही
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 22, 2024 11:58 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Jarange vs Baraskar : गावातले म्हणतात बलात्कार केलेला, नेत्याने वाचवला; जरांगे पाटलांचे बारस्करांवर आरोप


