Ajay Baraskar : जरांगेंचे आधीचे सहकारी, जरांगेंचे आताचे विरोधक का झाले? बारस्करांची Exclusive मुलाखत
- Published by:Priya Lad
Last Updated:
राठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलनाची धग पेटवणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावरच त्यांच्या सहकाऱ्याने गंभीर आरोप केले आहे.
मुंबई : मराठा आरक्षणासाठी झटणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांचे सहकारी अजय महाराज बारस्कर यांनीच खळबळजनक आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला फसवलं, गुप्त बैठका घेतल्या, आंदोलनामागे कुणाचा हात आहे, असे अनेक गंभीर आरोप अजय बारस्कर महाराज यांनी केले आहे. जरांगे पाटील यांनी यावर हा ट्रॅप असल्याचं म्हणत प्रत्युत्तर दिलंय. तसंच बारस्कर महाराजांवरही गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, आतापर्यंत जरांगेंची साथ देणारे त्यांचे सहकारी असलेल बारस्कर अचानक जरांगेचे विरोधक का झाले? बारस्कर यांची ही एक्सक्लुझिव्ह मुलाखत.
‘मनोज जरांगे पाटील यांना जालन्यामध्ये ओळखले जात होते. पण अंतरवालीच्या आंदोलनापासून ते महाराष्ट्राला कळाले. मुळात अंतरवाली सराटीमध्ये आंदोलकांवर जो लाठीचार्ज झाला तो दुर्दैवी होता. त्यानंतर जरांगेंची भूमिका ही सगळ्यासमोर बोललं पाहिजे, पारदर्शक असलं पाहिजेस हे चांगलं होतं. मला मोडी भाषा येते. मलाही बोलता येते. मी शासकीय कार्यालयात जाऊन वाचत होतो. मी बऱ्याच कुणबी नोंदी शोधल्या. त्यावेळी माी त्यांच्यासोबत आलो. त्यांनी सगेसोयरे हा शब्द काढला. त्यांनी काही निवेदनं दिली. पण ती कायद्यात कशी बसवायची हे जरांगे यांना समाजवून सांगितलं. त्यांना सगळं काही लिहून दिलं होतं. सत्य बोललं तर राग येत असतो अशी मराठवाड्यात म्हण आहे. तुकोबांचा मी अनुयायी आहे. पण आज मी सत्य बोललो तर त्यांना राग आला.
advertisement
‘अध्यादेश काढला तो सरकारचा फक्त मसुदा होता. मुंबईला निघण्याआधी बऱ्याच घडामोडी घडल्या. अंतरवालीमधून निघणार होतो त्यावेळी काहीच लोक नव्हती. वाशीला आलेली लोकसंख्या ही फुगवलेली होती. त्यानंतर वाशी आणि लोणवळ्यात बैठक झाली. गुप्त बैठक झाली होती. त्या बैठकीत आम्ही नव्हतो. त्या बैठकीला भांगे साहेब होते, त्यांच्या जातीचा उल्लेख केला. इतका द्वेष जरांगेंच्या मनात होता. पण वाशीला जाऊन काय मिळालं, फक्त सरकारकडून मुसदा मिळाला. 16 तारीख लिहिलेली होती. मग परत उपोषणाला बसण्याची गरजच नव्हती.
advertisement
आता मी बोललो तर, माझ्या घरी सगळ्यांचे फोन सुरू आहे, माझी बायको रडतेय, माझ्या नातेवाईक मला फोन करत आहे. ही लोक घर जाळा असं काही सांगत आहे. जरांगेंनी तुकोबा रायांचा अपमान केला आहे. रोज तिथे किर्तन होत असतात. किर्तनकार म्हणायला लागले, अंतरवाली हेच आपली देहू आणि आळंदी आहे. किर्तनकारांनी काही तरी ठेवलं पाहिजे.
advertisement
तो फोन आला आणि….
वाशीतून आल्यानंतर 10 तारखेला बैठक घ्या,असं सगळे जण म्हणत होते. 16 तारखेला आपण उपोषण करणार असं ठरलं होतं. पण ते कुणाचं ऐकत नव्हते. माझ्या मराठा माणसांना विचारूनच निर्णय घेईल असं म्हणाले होते. पण त्यावेळी त्यांना एक फोन आला, ते बोलत गेले आणि त्यांनंतर पत्रकारांशी बोलत असताना उपोषणाला बसलो असं जाहीर करून टाकलं. त्या माणसामध्ये नुसता अंहकार आहे. तो लोकांना हाकलून देतो. सभांमध्ये ते घाणरेड्या भाषेत टीका करतात. एका रात्रीत लॉटरी लागली आणि भिखारी सुद्धा झाले आहे. पण त्यांना व्यवस्थितीत लोकांना हाताळता येत नाही.
advertisement
जरांगेंच्या आंदोलनाला खर्च कुणाकडून?
‘शेवटी खर्च येतच असतो, मराठा समाजाला काय फायदा झाला. जरांगेंच्या नावाने एक माणूस भडकतो, सदावर्ते कोर्टात जाणार आहे. सदावर्ते जरी कोर्टात गेला तरी मी कोर्टात जाईल. जरांगेंवर व्यक्तिगत राग आहे, मी कसा मोठा होईल, हेच ते करत होते. जरांगेंना उपोषण हे पंतप्रधानांच्या हाताने सोडायचं होतं.
सिनेमाला पैसा कुठून आला? ते घर का फोडलं?
त्यांच्यावर आता सिनेमा येणार आहे, त्यासाठी पैसा कुठून आला आहे. मराठा समाजाला जरांगेंनं उद्धवस्त केला आहे. माझे व्हिडीओ खोडून दाखवावे. वामनराव वायकर, बाबूराव वायकर यांची घरं उद्धवस्त केले आहे. नारायण रावांच्या घरावर झेंडा लावायचा आहे. तू भगवा झेंडा लावायला पोरगं देत नाही, असा आरोप केला. पण त्यांना कोपर्डी प्रकरणातील मारेकऱ्यांना मारायचं होतं. त्यासाठी त्यांनी या पोरांना कोयते दिले होते. त्यासाठी या पोराला फोडलं. मी एकटाच नाही तर अनेक जण बोलणारे आहे. पण कुणी पुढे येण्यासाठी घाबरत आहे. पण बोलणारे बरेच आहे. माझं मरण जर जरांगेंच्या हाताने असेल तर ते सुद्धा येई द्या, पण जर बसचा ड्रायव्हर दारू प्यायलेला असेल तर प्रवाशांना सांगितलं पाहिजे ना. मी जे बोलतोय त्यामुळे माझ्या घरची परिस्थितीत घाबरलेली आहे.
advertisement
मुख्यमंत्री शिंदेंची ती चूक होती!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अंतरवालीमध्ये गेले, ती त्यांची चूक झाली. मुख्यमंत्र्यांसारखा हा माणूस आहे. ते मराठा समाजासाठी तिथे गेले होते. जर मुख्यमंत्र्यांनी नारळ पाणी पाजलं असेल तर तो माणूस मोठा होईलच ना. त्यामुळे जरांगे हे मोठे झाले.
advertisement
जरांगेंच्या आंदोलनाचा त्या नेत्याला फायदा!
जरांगे यांना राजकीय पक्षाचं पाठबळ आहे हे सत्य आहे. याचा पुरावा नाही. पण या आंदोलनामुळे कुणाला फायदा झाला हे उघड आहे. लोक सरकारला शिव्या देत होते. या सरकारला खाली खेचा असं लोक म्हणत होते. या जरांगेंनी फडणवीसांवर टीका केली होती. आता फडणवीस साहेब म्हणत आहे. मग आता साहेब कसं म्हणत आहे. जरांगेंनी सगळ्या नेत्यांवर टीका केली. पण त्याने कुणावरही टीका केली नाही. त्या ज्येष्ठ नेत्याने खूप काम केलं आहे. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. पण त्या नेत्यावर जरांगेंनी कधीच टीका केली नाही, हे संशोधनाचा विषय आहे. जरांगेंच्या आंदोलनाचा त्या राजकीय नेत्याला फायदा झाला आहे.
जरांगे निवडणूक लढवणार का?
view commentsकुणालाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. आता ते मोठे झाले आहे. त्यांच्या मनात काय आहे, कुणी सांगू शकत नाही. पण ते काहीही करू शकतात. आज मी विरोधात बोलत आहे माझ्यावर अनेक जण टीका करत आहे.
Location :
Maharashtra
First Published :
February 22, 2024 11:38 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajay Baraskar : जरांगेंचे आधीचे सहकारी, जरांगेंचे आताचे विरोधक का झाले? बारस्करांची Exclusive मुलाखत


