TRENDING:

बापमाणूस! लग्न सोहळ्यात एकाचवेळी 52 मुलींना दिलं सोनं, आतापर्यंत 765 मुलींचं केलं कन्यादान

Last Updated:

Mass Wedding: जालन्यातील नुकताच एक सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. यामध्ये 52 वधूंना सोन्याचं मंगळसूत्र आणि संसारोपयोगी साहित्य भेट देण्यात आलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायण काळे, प्रतिनिधी
advertisement

जालना: विवाह सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा प्रसंग असतो. प्रत्येकालाच आपला विवाह धुमधडाक्यात व्हावा असं वाटत असतं. मात्र अनेकांना आर्थिक अडचणीमुळे ते शक्य होत नाही. अशा गरजू लोकांसाठी मागील अनेक वर्षांपासून भाईश्री फाउंडेशन ही संस्था काम करतेय. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जालन्यात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विवाह इच्छुक 52 जोडपी लग्नबंधनात अडकली.

advertisement

जालना शहरातील दानकुवर महाविद्यालयाच्या मैदानात हा अनोखा विवाह सोहळा संपन्न जाला. गेल्या 11 वर्षांपासून भाईश्री फाउंडेशनच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून आत्तापर्यंत तब्बल 765 मुलींचं कन्यादान फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.

IT नोकरी सोडली, 'ही' तरुणी गावाकडे आली, सुरू केला 'हा' स्टार्टअप; शेकडो महिलांचं बदललं आयुष्य!

advertisement

सोन्याचं मंगळसूत्र अन् खास भेट

हिंदू धर्मात महिलांसाठी मणी-मंगळसूत्र सौभाग्याचं लेणं मानलं जातं. त्यामुळे या सामुदायिक विवाह सोहळ्यात वधूंसाठी खास सोन्याचे मणी-मुंगळसूत्र देण्यात आलं. सोन्याचे दर गगनाला भिडलेले असताना देखील 3 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र प्रत्येक वधूला देण्यात आलं. प्रत्येक मंगळसूत्राला ३० हजार रुपये मोजावे लागले. तर ५२ मंगळसूत्रांसाठी 15 लाख 60 हजार रुपये मोजावे लागले. आम्ही मुलींना जीवनावश्यक वस्तू देतो. एसी, टीव्ही कूलर फ्रिज यासारख्या वस्तू न देता जीवन जगताना पदोपदी आवश्यक असणाऱ्या घरगुती वापराच्या वस्तू दिल्या जातात, असं रमेश भाई पटेल यांनी सांगितलं.

advertisement

दरम्यान, नवदाम्पत्याला मणी-मंगळसुत्रासोबतच संसारोपयोगी साहित्य देण्यात येतं. यामध्ये कपडे, भांडी, पलंग, आरमारी, गादी आदी गोष्टी दिल्या जातात. तसेच लग्नाला आलेल्या पाहुण्यांची जेवणाची खास व्यवस्था करण्यात येते. प्रत्येक नवविवाहित दाम्पत्य स्वत: पाहुणेमंडळींना जेवण वाढू शकतात, अशी व्यवस्था केलेली असते.

50 लाखांचा खर्च

“आम्ही सर्व समाजाला सोबत घेऊन चालतो. जालन्यातील सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न असतो. या विवाह सोहळ्याला साधारणपणे 50 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. मराठवाडा हा दुष्काळी प्रदेश आहे इथे शेतकऱ्यांचे उत्पन्न अत्यल्प आहे. प्रत्येक शेतकऱ्याला दोन-तीन मुली आहेत. या मुलींचे लग्न करण्यासाठी शेतकऱ्यांना आपली जमीन गहाण ठेवावी लागते. शेतकरी कर्जबाजारी होतात. पुढे अनेक समस्या उद्भवतात. हे टाळण्यासाठी हा सामाजिक उपक्रम सुरू करण्यात आल्याचं भाईश्री रमेश भाई पटेल यांनी सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
बापमाणूस! लग्न सोहळ्यात एकाचवेळी 52 मुलींना दिलं सोनं, आतापर्यंत 765 मुलींचं केलं कन्यादान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल