IT नोकरी सोडली, 'ही' तरुणी गावाकडे आली, सुरू केला 'हा' स्टार्टअप; शेकडो महिलांचं बदललं आयुष्य!

Last Updated:

झफ्फरपूरच्या सक्रा केशोपूर गावातील सफा इक्बाल हिने कोरोनात आपली IT नोकरी सोडून लाखेच्या बांगड्यांचा व्यवसाय सुरु केला. तिने गावातील 5 किमी परिसरातील गरीब व निराधार महिलांना...

Shafa Iqbal
Shafa Iqbal
मुझफ्फरपूरमधील साक्रा केशोपूर गावात राहणाऱ्या शफा इक्बाल यांनी लाखाच्या बांगड्या आणि कंगण बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. आज या छोट्या गावातून लाखोंच्या संख्येने लाखाच्या बांगड्या तयार होत आहेत आणि देशभरासोबत परदेशातही या बांगड्यांना मोठी मागणी आहे.
शफाचा हा कारखाना केवळ व्यवसायापुरता मर्यादित नाही, तर गावातील अनेक गरजू, गरीब आणि निराधार महिलांसाठी तो आशेचा किरण ठरला आहे. अनेक अशा महिला, ज्या पूर्वी शेतात मजुरी करत होत्या किंवा घरातच बेरोजगार बसल्या होत्या, त्यांना शफाने रोजगार दिला आहे.
शफा मोफत प्रशिक्षण देऊन महिलांना बनवते सक्षम 
गावाच्या पाच किलोमीटरच्या परिघातल्या महिलांना शफा मोफत प्रशिक्षण देते. विशेष म्हणजे प्रशिक्षणाच्या काळातही महिलांना थोडे पैसे दिले जातात, जेणेकरून त्यांचा आत्मसन्मान टिकून राहावा. एकदा का काम शिकून झाले की, या महिलांना दररोज किंवा मासिक पद्धतीने पगार दिला जातो. गावातल्या अनेक महिला लग्नानंतर घराबाहेर पडत नाहीत, त्यांचाही विचार करून शफा त्यांना घरीच काम देते. लग्नसराईच्या हंगामात जेव्हा लाखाच्या बांगड्यांची मागणी वाढते, तेव्हा अधिक महिलांना घरूनच काम देण्यात येते.
advertisement
करोनात नोकरी गेली, आणि सुरू झाला ‘लाखाचा’ प्रवास
शफा एकेकाळी आयटी कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकरीत होती. पण करोना काळात तिला ती नोकरी सोडावी लागली आणि मग ती गावात परतली. शहरातून गावात आल्यावर तिने स्वतःचं काही तरी सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणि तिने सुरू केला ‘लाख क्लस्टर’. या व्यवसायाची सुरुवात करताना शफाने गावातील अशिक्षित, गरीब, निराधार महिलांना एकत्र बोलावलं आणि त्यांना विचारलं - "एक कंपनी सुरू करणार आहे, काम कराल का?" सुरुवातीला महिलांना काहीही माहिती नव्हतं, पण शफाने त्यांना प्रशिक्षण दिलं. आज याच महिला महिन्याला 5 ते 10 हजार रुपये कमावत आहेत.
advertisement
मराठी बातम्या/Success Story/
IT नोकरी सोडली, 'ही' तरुणी गावाकडे आली, सुरू केला 'हा' स्टार्टअप; शेकडो महिलांचं बदललं आयुष्य!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement