जालना : महाराष्ट्राला समृद्ध असा लोककला परंपरा आणि संस्कृतीचा वारसा लाभला आहे. मात्र या गोष्टी कुठेतरी मागे पडताना आपल्याला दिसत आहेत. हीच लोककला टिकून राहावी म्हणून जालना शहरातील जेईएस महाविद्यालयात दहा दिवसीय लोककला प्रशिक्षण शिबिर संपन्न झालं. त्याचा समारोप रविवारी करण्यात आला. केवळ दहाच दिवसांमध्ये आत्मसात केलेल्या कलेचे सादरीकरण रविवारी जेईएस महाविद्यालयात करण्यात आलं. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अफलातून सादरीकरणाने रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं.
advertisement
लोककला प्रशिक्षण शिबिर संपन्न
महाराष्ट्राची लोककला हा महाराष्ट्राचा प्राण आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र शासन देखील लोककलेच जतन व्हावं यासाठी जागर घडवत आहे. त्या प्रयत्नांमध्ये जेईएस महाविद्यालय स्वतःचा खारीचा वाटा उचलत आहे. महाविद्यालयातील लोककला विभागाचे प्राध्यापक यशवंत सोनवणे आणि कल्याण उगले यांच्या संकल्पनेतून नुकतंच दहा दिवसीय लोककला प्रशिक्षण शिबिर संपन्न झालं.
जालन्यातील या हॉस्पिटलचा अनोखा उपक्रम, पत्रकारांसाठी 6 प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत
28 ते 30 विद्यार्थी शिबिरात सहभागी
ज्याप्रमाणे उन्हाळी शिबिरे होतात. त्याप्रमाणे लोककला प्रशिक्षण शिबिर का होऊ नये अशी एक संकल्पना पुढे आली. त्यातूनच हे दहा दिवसांचे प्रशिक्षण घडलं. सुरुवातीला विद्यार्थ्यांचा थंड प्रतिसाद पाहून आम्हाला थोडंसं वैषम्य वाटलं. पण नंतर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत गेला आणि तब्बल 28 ते 30 विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले,असं महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश अग्निहोत्री यांनी सांगितलं.
खरं म्हणजे दहा दिवसांमध्ये दिमडी वाजवायला शिकणं, ढोलकी वाजवायला शिकणं, तुनतून वाजवायला शिकणं या सगळ्या गोष्टी फार कठीण आहेत. विद्यार्थ्यांनी सादर केलेलं भारुड ऐकल्यानंतर तर मी आश्चर्यचकित झालो. विंचू चावला हे विद्यार्थ्यांनी सादर केलेले संत एकनाथांचे भारूड अतिशय अप्रतिम होतं, अशी भावना प्राचार्य गणेश अग्निहोत्री यांनी व्यक्त केली.
कौतुकास्पद! 58 वर्षांची महिला झाली बारावी पास, पुण्यातल्या मावळमधील प्रेरणादायी कहाणी
या दहा दिवसांच्या शिबिरात आम्ही खूप आनंद लुटला. यामध्ये आम्हाला खूप प्रकारचे लोककला प्रकार शिकायला मिळाले. ढोलकी, संबळ, तुंतुने, दिमडी यासारखे वेगवेगळे वाद्य प्रकार शिकायला मिळाले. प्राध्यापक कल्याण उगले यांनी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गीत शिकवले. पोवाडा शिकवला, शाहिरी शिकवली, शाहिरी गण शिकवला. त्याच पद्धतीने भारुड शिकवले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कल्याण सरांनी आम्हाला कलाकार कसा असावा आणि त्याचबरोबर माणूस म्हणून कसं जगावं हे देखील शिकवलं. आम्हाला या शिबिरात सहभागी होऊन आणि इथे सादरीकरण करून खूप छान वाटलं. आम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या सगळ्यांचे खूप खूप आभार अशी प्रांजळ भावना कृष्णा सोनुने हिने व्यक्त केली.