TRENDING:

जालना अग्निशामक दलात 4 अत्यंत स्पेशल अन् अत्याधुनिक बुलेट दाखल; जाणून घ्या, असं काय आहे यात विशेष?

Last Updated:

या बुलेट कशा आहेत, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत याबाबतची माहिती जालना येथील अग्निशामक अधिकारी महादेव पानपट्टे यांनी दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायण काळे, प्रतिनिधी
advertisement

जालना : जालना अग्निशामक दलात चार अत्याधुनिक बुलेट गाड्या दाखल झाल्या आहेत. शहरातील गल्ली-बोळात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या बुलेट गाड्या ठरणार आहेत. या बुलेट गाड्यांमध्ये असलेले लिक्विड 100 लिटर पाण्याची बरोबरी करतात. त्याचबरोबर या बुलेटवर वेगवेगळी उपकरणे लावण्यात आली आहे. यामुळे गल्ली-बोळातील आगी बरोबरच इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.

advertisement

या बुलेट कशा आहेत, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत याबाबतची माहिती जालना येथील अग्निशामक अधिकारी महादेव पानपट्टे यांनी दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, या बुलेट गाड्या या आपल्या वापरातील बुलेट गाड्या प्रमाणेच आहेत. मात्र, त्यांना अग्निशामक दलाच्या उपयोगितेप्रमाणे मॉडिफाइड करण्यात आला आहे.

या गाड्यांची सगळ्यात महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये AFFF प्रकारचा फोम हा देण्यात आलेला आहे. 100 लीटर पाण्याची बरोबरी केवळ एक लिटर AFFF फोममुळे होते. त्याचबरोबर इतर वाहनांपेक्षा या वाहनाला वेगळे बनवण्यासाठी विशिष्ट अशा प्रकारचा अंबर दिवा या गाड्यांना देण्यात आला आहे. या लाईटमुळे ही अग्निशामक विभागाची बुलेट असल्याचे लोकांना लक्षात येईल.

advertisement

पुण्यात रिक्षाचालकांसाठी राबवली जातेय एक विशेष योजना, प्रवाशांनाही होणार विशेष फायदा!

इतर वाहनधारकांना या बुलेटची रुंदी लक्षात यावी, यासाठी दोन स्पार्किंग लाईटदेखील या बुलेटला देण्यात आले आहेत. त्याचबरोबर अग्निशामक विभागाचं सायरन वाजवण्यासाठी एक उत्तरदेखील देण्यात आले आहे. ही फायर बुलेट आहे हे लक्षात येण्यासाठी बुलेटच्या पाठीमागील बिलवर एक निळा दिवा लावण्यात आला आहे. घटनास्थळी गेल्यानंतर सिलेंडर काढण्यासाठी व इतर गोष्टींमध्ये मदत होण्यासाठी निळ्या दिव्याच्या खालीच एक आणखी एक लाईट देण्यात आला आहे.

advertisement

एका बुलेटवर सहा सिलिंडर -

एका बुलेट वाहनावर प्रत्येकी 9 किलो वजनाचे फोमचे दोन आणि सीओटू व एबीसी एअरचे चार असे सहा सिलिंडर राहणार आहेत. अग्निशमन विभागाचा कर्मचारी घटनास्थळी पोहोचून फोम सिलिंडर पाठीवर घेवून आग विझवू शकतील. गॅस सिलिंडर, विजेची उपकरणे, महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर, डिझेल व पेट्रोल टँकर आदींना लागलेल्या आगीवर यामुळे कमी वेळेत नियंत्रण मिळेल.

advertisement

पारंपारिक लुकवर सुंदर दिसतील अशा पर्स, दादरमधील अनेकांच्या आवडीचं असं दुकान, हे आहे Location

जालना शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता गल्ली-बोळामध्ये आग लागण्याची प्रकार वाढत चालले आहेत. या प्रकारच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या 4 अत्याधुनिक बुलेट गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची संख्याही दिवसेंदिवस वाढते. या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये लहान-मोठ्या आगीच्या घटनासुद्धा मोठ्या प्रमाणात घडतात. या आगेवर नियंत्रण मिळवण्यासाठीही या बुलेट गाड्यांचा वापर प्रभावी ठरणार असल्याचे अग्निशामक अधिकारी महादेव पानपट्टे यांनी सांगितले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
जालना अग्निशामक दलात 4 अत्यंत स्पेशल अन् अत्याधुनिक बुलेट दाखल; जाणून घ्या, असं काय आहे यात विशेष?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल