हिंदू-मुस्लिम वाद आपल्या देशात काही नवीन नाहीत. परंतु हिंदू-मुस्लिम एकोप्याच्या देखील अनेक घटना समोर येत असतात. जालना शहरातील एक मुस्लिम व्यक्ती इब्राहिम शेख मागील 14 वर्षांपासून संत गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत करतात. सन 2014 मध्ये संत गजानन महाराजांच्या पालखीमध्ये मोठा अपघात झाला होता.
advertisement
Free Haircut: जालन्यातील नाभिक समाजानं ठरवलं, रस्त्यावर थाटलं दुकान, मोफत करतायत दाढी-कटिंग, Video
या अपघातामध्ये तब्बल 20 ते 22 वारकऱ्यांचा मृत्यू झाला. हीच बाब मनाला लागल्याने इब्राहिम शेख यांनी कुणाचाही विचार न करता आपणही या लोकांची सेवा करावी या उद्देशाने वारकऱ्यांचे स्वागत करण्याची परंपरा सुरू केली. आजतागायत अखंडित सुरू आहे.
संत गजानन असतील, विठ्ठल असतील, ही देवच वारकऱ्यांना तारत असतात. जवळपास महिनाभर शिस्तीने चालत भक्ती करत असतात. वारकऱ्यांची श्रद्धा आणि भक्ती आम्ही जवळून पाहिली आहे. अत्यंत साधीभोळी आणि प्रामाणिक हे लोक असतात. लोक वारकऱ्यांची विविध माध्यमातून सेवा करतात. आशीर्वाद घेतात. आपल्या हातून देखील वारकऱ्यांची काही सेवा घडावी म्हणून मागील अकरा वर्षांपासून मी हा उपक्रम सुरू केल्याचे इब्राहिम शेख यांनी लोकल 18 बोलताना सांगितलं.





