TRENDING:

काय सांगता! जालन्यातील गणेश मंडळानं बनवली 101 किलो चांदीची मूर्ती, Video

Last Updated:

जालना शहरात गणोशोत्सवाच्या निमित्तानं 101 किलो चांदीचे बाप्पा विराजमान झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना, 20 सप्टेंबर :  जालना शहराला  'जालना सोने का पालना' असं म्हंटलं जातं ते उगात नाही. जालना शहरातल्या स्टिल उद्योगामुळे त्याला हे नाव लाभलंय. शहरात फिरताना जागोजागी 'सोन्याचा पाळणा' या म्हणीचा प्रत्यय येतो. गणेशोत्सवही याला अपवाद नाही.जालनामधील एका मंडळानं चक्क 101 किलो चांदीची गणेश मूर्ती बनवली आहे. कशी आहे ही मूर्ती पाहूया विशेष रिपोर्ट
advertisement

जालना शहरातलं अनोखा गणेश मंडळ नाविन्यपूर्ण देखावे करण्यासाठी प्रसिद्ध आहे. याच मंडळानं ही मूर्ती बनवलीय. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगावमधून त्यांनी ही मूर्ती मागवलीय. त्याचबरोबर त्यांनी अयोध्येत तयार होत असलेल्या श्रीराम मंदिराचा भव्य देखावा देखील सादर केलाय.

उंदराच्या कानात सांगितल्यानंतर पूर्ण होते इच्छा, नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती

'आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाही जालना शहरातील गणेशभक्तांसाठी एक अनोखा प्रयोग करत आहोत. यापूर्वी आम्ही आकाशात झेपावणारे हनुमान, कलिमाता आणि शिवतंडव नृत्य करत असलेले  शंकर असे देखावे सादर केले आहेत. यावर्षी अयोध्येत काम सुरू असलेल्या राम मंदिराचा देखावा सादर करत आहोत. त्याचबरोबर तब्बल 101 किलो वजनाची चांदीची मूर्ती आम्ही खामगावमधून आणली असल्याचं मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जगदीश भरतीया यांनी सांगितलं.

advertisement

घरात लावा लक्ष्मीला आवडणारी ही 7 रोपे, येईल धनसंपदा आणि समृद्धी

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जवळ असलेल्या या मंडळाच्या देखाव्याची चर्चा दरवर्षी मोठ्या प्रमाणावर होत असते. दरवर्षी काही ना काही हटके प्रयोग करून हे मंडळ सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत असते. चांदीची गणेश मूर्ती आणि राम मंदिराचा देखावा याबरोबरच तब्बल सहा दिवस इथे महाप्रसाद दिला जाणार आहे. त्याच बरोबर लहान मुलासाठी यंदा छोटेखानी यात्रा भरवण्यात येणार आहे. गणेशोत्वाच्या काळात रोज 5 हजार याप्रमाणे 50 हजार बिस्किटांचे वितरण करण्यात येणार आहे. शहरातील भक्तासाठी हे सगळं निःशुल्क आहे, असं  भरतीया यांनी स्पष्ट केलं.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
काय सांगता! जालन्यातील गणेश मंडळानं बनवली 101 किलो चांदीची मूर्ती, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल