नेमकं घडलं काय?
जालन्यातील बदनापूरच्या दोघी अल्पवयीन मुली शाळेत जात असल्याचं सांगून घराबाहेर पडल्या. त्यांनी थेट मुंबई गाठली आणि मुंबईवरून बिहार अन् बिहार येथून थेट नेपाळ गाठले. मुली घरी न परतल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत मुली बेपत्ता असल्याची तक्रार केली. पोलिसांनी तांत्रिक तपास करीत दोन्ही अल्पवयीन मुलींना मुंबईतून ताब्यात घेतले. मुली घरी सुखरूप परत आल्यानंतर कुटुंबीयांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. मुलीच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
advertisement
Marriage Fraud: दोन लाख देऊन लग्न केलं, तीन तासांत नवरी ‘भुर्र’, पाहा बीडमध्ये काय घडलं?
इंटरनेटवर शोधलं
विशेष म्हणजे या मुलींनी इंटरनेटवर पर्यटनासाठी 10 देश असं सर्च केलेलं आढळले. नेपाळमध्ये पासपोर्टची गरज नसल्याचे लक्षात आल्याने नेपाळला जाण्याचा निर्णय घेतला. या मुलींनी नेपाळमध्ये दोन दिवस हॉटेलमध्ये देखील मुक्काम केला. जानकीनाथ मंदिर पाहिले अन् तिथे देखील थांबल्या. या प्रवासात त्यांना 8 हजारांचा खर्च आला. फिरण्यासाठी घराबाहेर पडल्याची कबुली मुलींनी पोलिसांना दिली आहे.
मुंबईमध्ये राहण्याची होती तयारी
नेपाळ फिरून झाल्यानंतर मुंबईकडे येताना रेल्वेमध्ये आदित्य झा याच्यासोबत मुलींची ओळख झाली. मुंबईमध्ये खोली करून देण्यासाठी मदत करा, अशी विनंती मुलींनी झाकडे केली. परंतु, सोमवारी (ता. आठ) रात्री उशिरा मुली मुंबईमध्ये दाखल झाल्याने झा वडिलांसोबत त्यांना घरी घेऊन गेला. तांत्रिक तपासाच्या आधारावर पोलिस आज झाच्या घरी गेले व तेथे मुली आढळल्या.






