TRENDING:

किती खाणार? पालिका आयुक्ताला 10 लाखाची लाच स्विकारताना पकडलं, जालन्यात खळबळ

Last Updated:

तब्बल 10 लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना: जालना नगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर हे लाचेच्या जाळ्यात अडकले आहेत. तब्बल 10 लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
संतोष खांडेकर
संतोष खांडेकर
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदाराकडून प्रशासकीय कामकाजासंदर्भात सोय करण्याच्या मोबदल्यात 10 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ACB च्या अधिकाऱ्यांनी जाळे रचून आज प्रत्यक्ष कारवाई केली.

कारवाईदरम्यान आयुक्त संतोष खांडेकर यांनी कथितपणे मागितलेली लाच स्वीकारल्याचे आढळल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाकडून सुरू आहे. या घटनेमुळे जालना महानगरपालिकेत तसेच शहरात मोठी खळबळ उडाली आहे. नागरिक आणि कर्मचारी वर्गामध्ये या कारवाईची मोठी चर्चा रंगली असून, प्रशासनातील प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

advertisement

एसीबी कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी…

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याची उच्चांकी आवक, सोयाबीन उत्पादकांची आजही कोंडी, काय मिळाला भाव?
सर्व पहा

पालिका आयुक्त यांना ताब्यात घेऊन एसाबी कार्यालयात आणल्यानंतर एसीबी अधिकारी कार्यालयात पुढील कार्यवाही करत असताना कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी झाल्याचे देखील पहायला मिळाले. शहरातील आयुक्तांवरच कारवाई झाल्याने अधिकारी आणि  कर्मचारी वर्गात खळबळ उडाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या कारवाईने भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
किती खाणार? पालिका आयुक्ताला 10 लाखाची लाच स्विकारताना पकडलं, जालन्यात खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल