राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या जालना जिल्ह्यामध्ये तीन शाखा आहेत. या तीन शाखांपैकी सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका शाखेमध्ये या प्रकरणातील तक्रारदार केदारनाथ रामजी बुधवंत यांनी आपली रक्कम गुंतवली होती. परंतु त्यांना ती वेळेत न मिळाल्यामुळे आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. या गुन्ह्याच्या अनुषंगाने इतरही गुंतवणूकदारांनी फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली. त्या अनुषंगाने त्यांची बीड कारागृहात रवानगी करण्यात आली होती.
advertisement
सख्खा भाऊ झाला वैरी! अवघ्या 500 रुपयांसाठी घातला डोक्यात दगड, सोलापुरातील प्रकार
अंबाजोगाई न्यायालयाच्या परवानगीने बीड कारागृहातून या प्रकरणाचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश इधाटे यांनी काल चंदुलाल बियाणी यांना मंगळवारी जालन्यात आणले आहे. रात्री उशिरा वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्याच्या कोठडीत बियाणी यांचा मुक्काम होता. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केली जाईल. या तपासासाठी समाधान तेलंग्रे, गोकुळसिंग कायटे, अंबादास साबळे, फुलासिंग गुसिंगे, गजू भोसले, श्रीकुमार आडेप, रविंद्र गायकवाड, जया निकम, मंदा नाटकर, निमा घनघाव हे कार्यरत आहेत.
ठेवीदारांची 350 कोटींची फसवणूक
परळी येथील राजस्थानी मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीचा अध्यक्ष चंदूलाल बियाणी याला जालन्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड येथून अटक केली. राजस्थानी मल्टिस्टेटमध्ये जवळपास 350 कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा करून चंदूलाल पसार झाला होता. या प्रकरमात मल्टिस्टेटच्या अनेक संचालकांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, मराठवाड्यातील जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये खाजगी बँकांद्वारे सर्वसामान्य नागरिकांच्या फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात उघडकीस आले आहेत. बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या बँकेने सर्वसामान्य ठेवीदारांना कोट्यावधीचा चुना लावला. त्यानंतर राजस्थानी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने देखील सर्वसामान्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलीये.






