TRENDING:

जालन्यात पोलिसाला सापडली लाल रंगाची बॅग, लगेच केला फोन, पुढे जे घडलं ते...

Last Updated:

Jalna Police: जालन्यात भर चौकात लाल रंगाची बॅस दिसली. पोलिसाने लगेच फोन केला. एका कृतीचं आता सर्वत्र कौतुक होतंय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायण काळे, प्रतिनिधी
advertisement

जालना: पैशाच्या हव्यासापोटी हल्ली काहीजण गैरमार्ग अवलंबताना दिसतात. प्रसंगी खंडणी, अपहरण यासारख्या घटना देखील घडतात. मात्र जालना जिल्ह्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यांने दाखवलेला प्रामाणिकपणा चर्चेचा विषय ठरलाय. तब्बल एक लाख रुपयांचा ऐवज असलेली बॅग उदय शिरसाठ या पोलीस कर्मचाऱ्याने संबंधिताला परत केली. जालना पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्या हस्ते हा ऐवज संबंधित महिलेला परत देण्यात आला. शिरसाठ यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक होत असून पोलीस अधीक्षकांनी देखील गौरवोद्गार काढले आहेत.

advertisement

जालन्यातील पोलीस कर्मचारी उदय शिरसाठ कामाच्या ठिकाणी पोहोचत असताना मंठा चौफुली परिसरात पडलेली लाल रंगाची बॅग आढळली. ही बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये एक पर्स होती आणि त्या पर्समध्ये एक सोन्याची पोत, मोबाईल फोन आणि काही रोख रक्कम आढळली. सापडलेल्या मोबाईल फोन वरूनच त्यांनी कॉन्टॅक्ट काढून संबंधित महिला संपदा पडघन यांना कॉल केला आणि बॅग सापडल्याची माहिती दिली. संबंधित बॅग त्यांचीच असल्याची खात्री पटल्यानंतर एक लाख रुपयांचा ऐवज असलेली ही बॅग जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या हस्ते संपदा पडघन यांना देण्यात आली.

advertisement

12 वी झाली अन् घेतली म्हैस! घरातूनच करतोय लाखात कमाई, शेतकऱ्याच्या पोराचा नादच खुळा!

लगेच कॉल केला

“मी मंठा चौफुली येथून ऑफिसला येत होतो. मंठा चौफुली इथे मला लाल रंगाची बॅग सापडली. बॅग मध्ये एक मोबाईल आणि पर्स होती. पर्स मध्ये पिवळ्या रंगाची पोत आणि काही पैसे होते. मी त्यांना कॉल करून पैसे आणि ऐवज पोलीस अधीक्षकांच्या मार्फत परत केला, कसं पोलीस कर्मचारी उदय शिरसाठ यांनी सांगितले.

advertisement

प्रामाणिकपणाचा आदर्श

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर चुकूनही अशा वस्तू टाकू नका, संपूर्ण माहिती, Vid
सर्व पहा

“नोकरीच्या निमित्ताने जालना शहरामध्ये आहे. कन्हैया नगर कडून मंठा चौफुली मार्गे मी शहरात जात होते. अनावधानाने गाडीवरून माझ्याजवळ असलेली लाल रंगाची बॅग खाली पडली. पोलीस मामांनी कॉल करून मला त्याबद्दल कळवलं. जवळपास एक लाख रुपयांचा ऐवज त्या बॅगमध्ये होता. पोलीस काकांनी आमची बॅग आम्हाला परत दिली याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत,” अशा शब्दांत त्यांनी पोलीस कर्मचारी शिरसाठ यांचे आभार मानले. तसेच सर्वांनी असाच प्रामाणिकपणाचा आदर्श घ्यावा, असं देखील ते म्हणाल्या.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
जालन्यात पोलिसाला सापडली लाल रंगाची बॅग, लगेच केला फोन, पुढे जे घडलं ते...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल