TRENDING:

आठवी पास तरुणाचं देशी जुगाड, विजेशिवाय चालतेय पिठाची गिरणी, Video

Last Updated:

जालन्यातील शेतकऱ्याने तयार केलेल्या पिठाच्या गिरणीमुळे धान्यातील जीवनसत्वे नष्ट होत नाहीत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना, 18 नोव्हेंबर: गरज ही शोधाची जननी असते असं म्हटलं जातं. अनेक शोध हे गरजेतूनच लागल्याचं आपण इतिहासात डोकावून पाहिल्यास लक्षात येतं. जालना जिल्ह्यातील श्रीपत धामणगावचे रहिवासी असलेल्या सुनील शिंदे यांनी गरजेतून असाच एक देशी जुगाड तयार केला आहे. गावात असलेल्या विजेच्या समस्येला त्रासून त्यांनी सायकलच्या पेडलच्या साह्याने चालणारी पिठाची गिरणी तयार केलीये. विशेष म्हणजे या गिरणीतून तयार होणार पीठ हे नैसर्गिक पद्धतीने जात्यावर तयार होणाऱ्या पिठाप्रमाणेच आहे. यामुळे धान्यातील जीवनसत्वे नष्ट होत नाहीत.
advertisement

गरज शोधाची जननी

सुनील शिंदे हे घनसावंगी तालुक्यातील धामणगावचे रहिवाशी आहेत. त्यांच्याकडे पारंपारिक 17 एकर शेती आहे. शेती सांभाळून ते वेगवेगळे प्रयोग करत असतात. गावात पंधरा दिवस वीज नसल्याने पिठाची समस्या निर्माण झाली. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांच्या आईने घरी असलेल्या जात्यावर ज्वारी दळण्यास सुरुवात केली. जात्यावर दळलेल्या या ज्वारीच्या भाकरी अतिशय चवदार लागल्या. याबाबत त्यांनी आपल्या आईशी विचारणा केली असता नैसर्गिक पद्धतीने पीठ गरम न होता तयार होत असल्याने धान्यातील जीवनसत्वे निघून जात नाहीत. यामुळे भाकरी पौष्टिक लागल्याचं त्यांच्या आईने शिंदे यांना सांगितलं. इथूनच पेडलवर चालणाऱ्या गिरणीची निर्मिती सुरुवात झाली.

advertisement

शेतकऱ्याची सोयाबीनपासून दूध आणि पनीर निर्मिती; महिन्याला 40 हजार निव्वळ नफा, पाहा Video

देशभरातून गिरणीला मागणी

ही गिरणी तयार करण्यासाठी त्यांना असंख्य अडचणी आल्या. मात्र प्रत्येक अडचणीवर मात करून त्यांनी गिरणी अधिक अधिक सोयीची कशी होईल यासाठी प्रयत्न केले. जेव्हा गिरणी परफेक्ट तयार झाली असं त्यांना वाटलं तेव्हाच त्यांनी या गिरणीतून काम सुरू केलं. लोकांना देखील गिरणी आवडू लागली. सध्या त्यांना जालना शहराबरोबरच पुणे, मुंबई, नाशिक तसेच इतर राज्यातून देखील मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. यामुळेच त्यांनी जालना शहरात गिरणी निर्मितीचे स्वतंत्र युनिट सुरू केले आहे. ही गिरणी तयार करण्यासाठी वीस हजारांचा खर्च येत आहे. तयार झालेल्या गिरणीची 22 हजार रुपये एवढी किंमत त्यांनी ठेवली आहे. परराज्यातील ऑर्डरसाठी जीएसटी चार्जेस वेगळे असतील. या गिरणीच्या पेटंटसाठी देखील त्यांनी प्रयत्न सुरू केले असून वर्षभरामध्ये पेटंट मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे.

advertisement

महिला मंदिरात का फोडत नाहीत नारळ? जाणून घ्या खरं कारण Video

लवकरच पेटंट मिळेल

मी एक साधा शेतकरी आहे. घरी 17 एकर शेत जमीन आहे. गावात अनेक दिवस लाईट नसल्याने मला ही संकल्पना सुचली आणि मी त्यावर काम सुरू केलं. आजूबाजूच्या लोकांना गिरणी आवडल्याने मोठ्या स्तरावर गिरणी निर्मितीसाठी चालना शहरात काम सुरू आहे. राज्यातून तसेच बाहेर राज्यातून देखील या गेलेला मोठ्या प्रमाणावर ऑर्डर येत आहेत. गिरणीच्या पेटंट साठी देखील फाईल दाखल केली आहे. ते काम देखील लवकरच होईल असं सुनील शिंदे सांगतात.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
आठवी पास तरुणाचं देशी जुगाड, विजेशिवाय चालतेय पिठाची गिरणी, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल