प्रयागराज येथे महाकुंभ पर्वात कोट्यावधी भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारने काटेकोर नियोजन केले आहे. देशभरातील भाविकांसाठी विशेष रेल्वे गाड्यांची देखील सोय करण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यातील भाविकांना देखील महाकुंभ पर्वात सहभागी होता यावे, म्हणून रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
भाविकांसाठी महत्त्वाची बातमी, दख्खनचा राजा जोतिबाचे मंदिर राहणार 4 दिवस बंद
मराठवाड्यातून 22 जानेवारी ते 22 फेब्रुवारी या कालावधीत रेल्वे गाड्या टप्याटप्याने जाणार आहेत. प्रवासात अडचणी येऊ नयेत यासाठी रेल्वे विभागातर्फे आगाऊ - आरक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे भाविकांचा प्रवास सुखकर होणार असून भाविकांनी नियोजन करून सर्व सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आलेय.
असं असणार वेळापत्रक
22 जानेवारी: नांदेड ते पटणा नांदेडवरून रात्री 11 वाजता सुटेल.
25 जानेवारी: काचीगुडाते पटणा मार्गे नांदेड गाडी काचीगुडा दुपारी 4.45 वाजता सुटेल
7 फेब्रुवारी: सिकंदराबाद ते पाटणा मार्गे नांदेड गाडी सिकंदराबाद येथून संध्याकाळी 5 वाजता सुटेल
13 फेब्रुवारी नांदेड-पटणा गाडी नांदेडवरून रात्री 11 वाजता सुटेल.
19 फेब्रुवारी: छत्रपती संभाजीनगर - पटणा गाडी छत्रपती संभाजीनगर येथून संध्याकाळी 7 वाजता सुटेल.
22 फेब्रुवारीः काचीगुडा ते पटणा मार्गे नांदेड गाडी काचीगुडा येथून दुपारी 4.45 वाजता सुटेल.
25 फेब्रुवारी: छत्रपती संभाजीनगर - पटणा.
24 जानेवारी: पटणा ते नांदेड पटण्यावरून 3.30 वा.
27 जानेवारी: पटणाते काचीगुडा मार्गे नांदेड गाडी पटणा येथून सकाळी 11.30 वा.
9 फेब्रुवारी: पटणा ते सिकंदराबाद मार्गे नांदेड गाडी पटणा येथून दुपारी 3.30 वाजता सुटेल
15 फेब्रुवारी: पटणा तेनांदेड गाडी पटणा येथून दुपारी 3.30 वा. व नांदेड येथे 17 रोजी 4.30 वा. दाखल
21 फेब्रुवारी: पटणाते छ. संभाजीनगर दु. 3.30 वा. 24 फेब्रुवारी: पटणाते काचीगुडा मार्गे नांदेड गाडी पटणा येथून सकाळी 11.30 वा.
27 फेब्रुवारी: पटणा तेछ. संभाजीनगर दु. 3.30 वा.






